कुसुमताई नायकवडी समाजाचे चालते बोलते विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:19 AM2021-07-18T04:19:38+5:302021-07-18T04:19:38+5:30

ते हुतात्मा नगर सोनवडे (ता. शिराळा) येथील हुतात्मा नानकसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कुसुमताई नायकवडी यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त ...

Kusumatai Nayakwadi speaks of the community's running university | कुसुमताई नायकवडी समाजाचे चालते बोलते विद्यापीठ

कुसुमताई नायकवडी समाजाचे चालते बोलते विद्यापीठ

Next

ते हुतात्मा नगर सोनवडे (ता. शिराळा) येथील हुतात्मा नानकसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कुसुमताई नायकवडी यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त आयाेजित कार्यक्रमात ते बोलत होते. के. आर. भिलार अध्यक्षस्थानी होत्या.

गायकवाड म्हणाले, थोर कर्तृत्व असणाऱ्या व आदर्श शिक्षिका कुसुमताईंनी सार्वजनिक जीवनाबरोबर वैयक्तिक जीवनातही बारकावे आत्मसात केले होते. त्यांचे हेच बारकावे आपल्याही जीवनात उपयोगी पडतील. नागनाथअण्णा नेहमी सांगायचे आमच्या तीन पिढ्या चळवळीत सामील होत्या. त्यासाठी महिलांचे योगदान होते.

वंदना ठोंबरे म्हणाल्या, माईकडे काटकसर करण्याचा गुणधर्म होता. त्यामुळेच हुतात्मा संकुलाचे प्रत्येक उद्योग फायदेशीर ठरले.

किरण शिंदे यांनी स्वागत केले. यावेळी संदीप अडिसरे, एस. एस. आंबी, एन. एल. जगताप, जी. जी. पाटील, विजय नांगरे, बी. ए. तडाखे, यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. रोहिणी नाईक यांनी आभार मानले.

फोटो : १७ वारणावती १

ओळ : साेनवडे (ता. शिराळा) येथील हुतात्मा नानकसिंग विद्यालयात कुसुमताई नायकवडी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

Web Title: Kusumatai Nayakwadi speaks of the community's running university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.