बांधकामाचा दर्जा सुधारण्यासाठी लॅब-जिल्हा परिषदेचा निर्णय : स्थायी समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:15 AM2018-03-09T00:15:14+5:302018-03-09T00:15:14+5:30

सांगली : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या बांधकामाचा दर्जा तपासणीसाठी जिल्हा परिषदेने स्वतंत्र लॅब उभारण्याचा निर्णय घेतला आहे. लॅबमुळे स्वीय निधीत सुमारे दोन कोटी रुपयांचे उत्पन्न वाढण्याची आशा असल्याचे अध्यक्ष

Labor-Zilla Parishad's decision to improve the quality of construction: Standing committee meeting | बांधकामाचा दर्जा सुधारण्यासाठी लॅब-जिल्हा परिषदेचा निर्णय : स्थायी समितीची बैठक

बांधकामाचा दर्जा सुधारण्यासाठी लॅब-जिल्हा परिषदेचा निर्णय : स्थायी समितीची बैठक

Next

सांगली : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या बांधकामाचा दर्जा तपासणीसाठी जिल्हा परिषदेने स्वतंत्र लॅब उभारण्याचा निर्णय घेतला आहे. लॅबमुळे स्वीय निधीत सुमारे दोन कोटी रुपयांचे उत्पन्न वाढण्याची आशा असल्याचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन समितीकडे यासाठी २५ लाख रुपयांच्या निधीसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली. यावेळी बांधकाम व अर्थ समिती सभापती अरुण राजमाने, महिला व बालकल्या समिती सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, सभापती ब्रह्मानंद पडळकर, सभापती तम्मनगौडा रवी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, आदी उपस्थित होते.

बैठकीविषयी पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणाºया कामांचा दर्जा तपासण्यासाठी त्रयस्थ यंत्रणेस लाखो रुपये द्यावे लागतात. जिल्हा परिषदेने ती यंत्रणा उभी केली व इतर कामांचा दर्जा तपासण्याचे काम केले तर स्वीय निधीत मोठी भर पडू शकते. त्यामुळे स्वतंत्र लॅब याठिकाणी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. प्रशासनाकडे इमारत आणि कर्मचाऱ्यांची संख्या पुरेसी असल्याने लॅब उभारणे सोपे जाणार असल्याचे अधिकाºयांचे मत आहे.

याशिवाय अन्य खासगी कामेही उपलब्ध होण्याच्या आशा आहेत. मिनी मंत्रालयाच्या विविध विभागांकडे स्वीय निधी, जिल्हा नियोजन समितीचा निधी व शासन निधी  ३१ मार्चपूर्वी खर्च करण्यात यावा. अन्यथा, संबधित अधिकाºयांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. दिव्यांग अभियान अंतर्गत अद्याप काही दिव्यांग मित्र दाखल्यापासून वंचित आहेत. संबधितांना दाखले द्यावेत, असे आदेश देण्यात आले.

विशेष सभा घेणार : संग्रामसिंह देशमुख
राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानातून ‘आमचा गाव, आमचा विकास’ योजनेंर्र्तगत ग्रामपंचायतींना विकास आराखडा निश्चित करण्यासाठी ३१ मार्चपूर्वी ग्रामसभा घेण्यात यावी, असे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. ग्रामपंचायत विकास आराखड्यात काही बदल असल्यास विशेष सभा घेऊन त्यास ग्रामसभेची मंजुरी घ्यावी, असे आवाहन अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला मिळणारा निधी येत्या आठ दिवसांत खर्च झाला पाहिजे. यामध्ये जो अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करेल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. यामुळे शंभर टक्के निधी खर्च करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन देशमुख यांनी अधिकाऱ्यांना केले.

Web Title: Labor-Zilla Parishad's decision to improve the quality of construction: Standing committee meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.