घाटमाथ्यावर जनावरांची तडफड : चाऱ्याचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:12 PM2018-05-23T22:12:50+5:302018-05-23T22:12:50+5:30

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील कुची, जाखापूर, कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली, तिसंगी व घाटनांद्रे परिसरात चालूवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने चारा तयार न

 Lack of animals on the slopes | घाटमाथ्यावर जनावरांची तडफड : चाऱ्याचा अभाव

घाटमाथ्यावर जनावरांची तडफड : चाऱ्याचा अभाव

Next
ठळक मुद्देपशुखाद्याचे दरही भडकले; पशुधन जगविणे बनले जिकिरीचे

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील कुची, जाखापूर, कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली, तिसंगी व घाटनांद्रे परिसरात चालूवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने चारा तयार न झाल्याने व सध्या ओढे, नाले, बंधारे, तलाव कोरडे ठणठणीत असल्याने जनावरांच्या चाºयाचा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच पशुखाद्याचे दरही गगनला भिडल्याने आपसुकच पशुपालन व दुग्ध व्यवसायावर गंभीर परिणाम झाल्याने बळिराजाचे संपूर्ण अर्थकारणच कोलमडले आहे.

दुष्काळाच्या या दाहकतेने तालुक्यातील घाटमाथ्यावरील १४ हजार पशुधन धोक्यात आले असून, चारा, पाणीटंचाई व पशुखाद्याचे भडकलेले दर यामुळे पशुधन जगविणे कठीण झाले आहे. अनेक पशुपालक शेतकरी जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवू लागले आहेत. पशू खरेदी करणारे दलालही दर पाडून मागू लागले आहेत. घाटमाथ्यावरील शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. सिंचन योजनेचे काम न झाल्याने शेतीच्या, जनावरांच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, गर्जेवाडी, वाघोली, कुंडलापूर, जाखापूर व कुची या सात गावांमध्ये सुमारे साडेतेरा हजारापर्यंत पशुधन असून, तीव्र चारा व पाणीटंचाईत ते जतन करणे कसरतीचे बनले आहे.

सध्या कडब्याचे दर शेकडा १४०० ते १५०० पर्यंत असून त्यात गोळीपेंड, शेंगपेंड, सरकी पेंड, गहूआटा याचेही दर गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे घाटमाथ्यावर चालूवर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने ओढे, नाले, बंधारे व तलाव कोरडे ठणठणीत असून, विहिरी व कूपनलिकांनी तळ गाठला आहे. दिवसाकाठी मोठ्या जनावरांना १०० लिटर, तर लहान जनावरांना किमान ५० लिटर पाणी लागते. ते उपलब्ध होण्यासाठी कोणतेही स्रोत शेतकºयांकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे जनावरे कशी जगवायची? हा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.

पर्यायाने शेतीस पूरक अशा दुग्ध व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. तीव्र उन्हामुळे जनावरांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. यावर मात करण्यासाठी तात्काळ टेंभू जलसिंचन योजनेचे काम सुरू करणे गरजेचे आहे. पण राजकीय नेते मात्र नेहमीसारखे आज-उद्याचा पुकारा करताना दिसत आहेत. शेतकरी राजा तीव्रतेने टेंभू योजनेची प्रतीक्षा करताना दिसत आहे.

गाव गाई म्हैशी शेळ्या-मेंढ्या
तिसंगी ४८७ ६३२ ५३१
गर्जेवाडी १२७ १६४ १८४
कुंडलापूर २१६ २६१ २५६
घाटनांद्रे ४६७ ९९९ ८७१
वाघोली १४५ २६३ १३४
जाखापूर १९१६ २७३० १७३९
कुची ४५२ ७५५ ५८३

सरकी पेंड -७०० रूपये ( ५० कि.)
गोळी पेंड - १२०० रूपये (६० कि.)
गहू आटा-९०० रूपये (५० कि.)
शेंग पेंड - १४०० ते १५००
कडबा- १४०० ते १५००
( शेकडा)
हे सध्याचे दर असून, तेही स्थिर नसून त्यात वाढच होत आहे.

Web Title:  Lack of animals on the slopes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.