इस्लामपुरातील खासगी कोविड सेंटरमध्ये स्वच्छतेचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:26 AM2021-05-21T04:26:44+5:302021-05-21T04:26:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शहरात नागरी वस्तीत असलेल्या काही खासगी कोविड रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव आहे. इस्लामपूर-कामेरी रोडवरील खासगी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरात नागरी वस्तीत असलेल्या काही खासगी कोविड रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव आहे. इस्लामपूर-कामेरी रोडवरील खासगी रुग्णालयाच्या दारातच घाणीचे साम्राज्य आहे. या रुग्णालयात येणाऱ्या नातेवाइकांना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या नॉन कोविड रुग्णालये ओस पडली आहेत. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांची व्यवस्था नसतानाही काहींच्या कोविड सेंटरना मान्यता देण्यात आली आहे. बहुतांशी खासगी रुग्णालये नागरी वस्तीसह वर्दळीच्या ठिकाणी आहेत. त्यांच्या आसपास कोविड रुग्णांसह नातेवाईक वावरतात. यामुळे या परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या रुग्णालयांत वेळेवर स्वच्छता केली जात नाही. याबाबत विचारणा केली असता कामगारांचा अभाव असल्याचे सांगितले जात आहे. अशा रुग्णालयांना कोविड केंद्राची परवानगी कशी दिली, असा सवाल उपस्थित होत आहे.
अस्वच्छतेमुळे रुग्ण बरा होण्याऐवजी त्याचा आजार बळावत चालल्याची उदाहरणे आहेत. त्यातच या रुग्णालयात शिकावू डॉक्टरकडून उपचार केले जातात. एका कुुटुंबातील किसन दत्तू गावडे (वय ७२), त्यांचे पुत्र शामराव (३७) नागरी वस्तीबाहेर असलेल्या खासगी कोविड रुग्णालयात उपचार घेऊन बरे झाले. परंतु, गावडे यांचे दुसरे पुत्र भीमराव (४१) पहिल्यांदा कामेरी रोडवरील रुग्णालयात उपचार घेत होते. परंतु, तेथे व्हेंटिलेटरची व्यवस्था नसल्याने त्यांना कऱ्हाड येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर त्यांचा मृत्यू झाला.
कोट
कोविड रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव दिसून आल्यास किंवा त्याचा नागरिकांना त्रास होत असल्यास कारवाई करण्यात येईल. अशा रुग्णालयांनी वेळेत स्वच्छता करावी.
- नरसिंह देशमुख, अधिष्ठाता, उपजिल्हा रुग्णालय, इस्लामपूर.