जिल्ह्यात पाळीव पशूंच्या संख्येत मोठी घट...

By admin | Published: December 10, 2014 11:02 PM2014-12-10T23:02:35+5:302014-12-10T23:49:04+5:30

पंचवार्षिक गणती : सात वर्षात गाई, म्हैशी, शेळ््या, मेंढ्यांची संख्या दोन लाखांनी घटली

Lack of livestock population in the district ... | जिल्ह्यात पाळीव पशूंच्या संख्येत मोठी घट...

जिल्ह्यात पाळीव पशूंच्या संख्येत मोठी घट...

Next

सदानंद औंधे - मिरज -वाढते शहरीकरण, चाऱ्याची दरवाढ, कमी उत्पन्न, दुष्काळ, पाणीटंचाई यासह विविध कारणांमुळे जिल्ह्यात पशुपालकांची व पाळीव जनावरांची संख्या कमी होत आहे. जिल्ह्यातील पाळीव जनावरांच्या संख्येत गेल्या सात वर्षात मोठी घट झाली असून पशुसंवर्धन विभागाने केलेल्या पशुगणतीत गाई, म्हैशी, शेळ्या व मेंढ्यांच्या संख्येत दोन लाखांची घट झाली आहे.
पशुसंवर्धन विभागातर्फे दर पाच वर्षांनी जिल्ह्यातील पाळीव जनावरांचे सर्वेक्षण करून त्यांची संख्या मोजण्यात येते. जिल्ह्यात यापूर्वी २००७ मध्ये पशुगणना करून त्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर २०१२ च्या पशुगणनेचे काम दोन वर्षांनी पूर्ण होऊन पशुगणनेची आकडेवारी तयार झाली आहे. २००७ मध्ये १ कोटी ५६ लाख १९९३ एवढ्या पाळीव प्राण्यांच्या संख्येत घट होऊन १ कोटी ३८ लाख २७१७ एवढी सध्याची पाळीव प्राण्यांची संख्या आहे.
पोल्ट्री व्यावसायिक व पोल्ट्री कोंबड्यांच्या संख्येत तर मोठी घट झाल्याचे ताज्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. २६ लाख ४३ हजार असलेल्या पाळीव कोंबड्यांची संख्या आता केवळ ८ लाख ८७ हजार ८१० एवढी आहे.
पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांच्या संख्येत तब्बल तीन लाखाने कमी झाली आहे. पशुखाद्य व मजुरीचे वाढते दर, अंड्यांचा उत्पादन खर्च परवडत नसल्याने व बर्ड फ्लूच्या संकटाने पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांची संख्या कमी होत आहे. पाळीव कुत्र्यांची संख्याही २७ हजाराने, तर गाई व म्हैशींची संख्या ४० हजाराने कमी झाली आहे. पशुसंवर्धन विभागाने वर्षभर जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांमार्फत गणना केली आहे.
वाढते शहरीकरण, चारा व पशुखाद्याची दरवाढ, पशुपालनापासून मिळणारे कमी उत्पन्न, पाणीटंचाई व शिक्षित व्यक्ती पशुपालनापासून दूर असल्याने पाळीव प्राण्यांची संख्या कमी होत असल्याचा अंदाज पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. महेश बनसोडे यांनी व्यक्त केला. आकडेवारीनुसार जिल्ह्यातील पशूंना आवश्यक वैद्यकीय सुविधा, लसीकरणासह विविध कामांचे नियोजन करण्यात येते.


जिल्ह्यात ४ लाख ९२ हजार ६३३ म्हैशी व ३४ हजार २३४ रेड्यांची संख्या आहे. बैलांची संख्या ७९ हजार ३२६, तर गाई १ लाख ७० हजार ७३४ आहेत. गार्इंपैकी ३४ हजार ७६४ दूध देणाऱ्या, २७ हजार १६७ भाकड व ३०५५ वांझ आहेत. जर्सी गार्इंची संख्या १ लाख ६१ हजार ८०२ एवढी आहे.


४घोडे, गाढवांची संख्या वाढली
सर्वच पाळीव प्राण्यांची संख्या घटत असताना, पाळीव घोडे व गाढवांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. घोड्यांच्या संख्येत केवळ तीनने वाढ झाली आहे, तर गाढवांची संख्या सहाशेने वाढली आहे. पाळीव बदकांच्या संख्येत कोणतीच वाढ झालेली नाही.

सात वर्षातील आकडे

जनावरे २00७ २0१२
बैल, गाई ३,०८,०५२३,४१,५४७
म्हैशी ५,३६,९९६४,९२,६३३
मेंढ्या२,११,२२२ १,५७,३९०
शेळ्या ४,०९,८६० ३,२४,६३२
घोडे७६२ ७६५
खेचर८२ ८०
गाढवे ९७८ १,६७८
डुकरे ५,९३५३,७५६
कुत्री ८७,८१७६०,१३२
ससे २८९१०४
एकूण १५,६१,९९३१३,८२,७१७


२00७ मध्ये देशी कोंबड्या व इतर पक्षी २६ लाख ८३ हजार १४३, तर पोल्ट्री कोंबड्या ५५ लाख ८२ हजार ८०९ होत्या. सात वर्षानंतर देशी कोंबड्या ८ लाख ८७ हजार ८१0, तर पोल्ट्री कोंबड्यांची संख्या २१ लाख ३९ हजार ५७२ वर गेली.

Web Title: Lack of livestock population in the district ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.