लाडेगाव सरपंच बनले आरोग्यसेवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:06+5:302021-07-23T04:17:06+5:30
लाडेगाव (ता. वाळवा) येथे सरपंच रणधीर पाटील यांनी नागरिकांची अँटिजन चाचणी केली. लोकमत न्यूज नेटवर्क वशी : लाडेगाव (ता. ...
लाडेगाव (ता. वाळवा) येथे सरपंच रणधीर पाटील यांनी नागरिकांची अँटिजन चाचणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वशी : लाडेगाव (ता. वाळवा) येथील सरपंच रणधीर पाटील हे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून आले आहेत. ते स्वत: नागरिकांची अँटिजन चाचणी करीत आहेत. तसेच गावातील जि. प. शाळेमध्ये विलगीकरण कक्ष उभारला आहे.
विलगीकरण कक्षामध्ये रुग्णांसाठी मनोरंजन कार्यक्रम, तसेच दररोज वाचण्यासाठी दैनिके उपलब्ध केले आहेत. सध्या गावातील उपकेंद्रात लसीकरणासाठी गर्दी होत असल्याने अगोदर अँटिजन चाचणी करून रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच लसीकरणासाठी परवानगी असा अनोखा उपक्रम पाटील यांनी राबवला आहे. यासाठी त्यांना उपसरपंच अरविंद देसाई, ग्रामसेवक डी. पी. सिंग, तलाठी हिवरे, आरोग्यसमुदाय अधिकारी डॉ. विश्वनाथ पाटील, आरोग्य सेवक अमोल हिरवे, स्वाती भोसले, परिचारिका रूक्मिणी वाघमारे, दीपाली दाईनगडे, सुषमा कांबळे, संदीप पाटील, विनोद मदने, प्रमोद पाटील हे सहकार्य करीत आहेत.