कडेगावात लोकसहभागातून पडणार लख्ख प्रकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 01:35 PM2017-10-01T13:35:38+5:302017-10-01T13:42:12+5:30
लोकसहभागातून कडेगावात दोन मुख्य चौकात लख्ख प्रकाश पडणार आहे. शहरातील शिवाजी चौक व सुरेशबाबा देशमुख चौक येथे लोकसहभागातून दोन हायमास्ट लॅम्प बसविण्याचा प्रारंभ करण्यात आला. पांडुरंग डांगे यांच्या स्मरणार्थ शिवाजी चौकाच्या मधोमध हायमास्ट एलईडी लॅम्प संतोष डांगे यांनी दिला आहे, तर सुरेशबाबा देशमुख चौक येथे लिबर्टी ग्रुप व विजयदादा प्रतिष्ठान यांच्यावतीने मोठे सहा दिवे असणारा हायमास्ट लॅम्प देण्यात आला आहे.
कडेगाव : लोकसहभागातून कडेगावात दोन मुख्य चौकात लख्ख प्रकाश पडणार आहे. शहरातील शिवाजी चौक व सुरेशबाबा देशमुख चौक येथे लोकसहभागातून दोन हायमास्ट लॅम्प बसविण्याचा प्रारंभ करण्यात आला. पांडुरंग डांगे यांच्या स्मरणार्थ शिवाजी चौकाच्या मधोमध हायमास्ट एलईडी लॅम्प संतोष डांगे यांनी दिला आहे, तर सुरेशबाबा देशमुख चौक येथे लिबर्टी ग्रुप व विजयदादा प्रतिष्ठान यांच्यावतीने मोठे सहा दिवे असणारा हायमास्ट लॅम्प देण्यात आला आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग डांगे, सुरेशबाबा देशमुख आणि विजयदादा देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
शहरातील डॉक्टर, इंजिनिअर, राजकीय नेतेमंडळी, पत्रकार यांच्या संघटनात्मक कामातून कडेगाव स्मार्ट सिटी बनवूया. वॉटस् अप् ग्रुपची स्थापना करण्यात आली असून यातून कडेगाव शहराच्या विकासासाठी योगदान द्यावे, हा त्यामागचा उद्देश आहे. या ग्रुपमधून लोकांना शहर विकासाबाबत चांगले संदेश देण्यात येत असून काही विकासकामे मार्गी लागलेली आहेत. यातूनच शहरातील दोन मुख्य चौकात हायमास्ट एलईडी लॅम्प बसविण्याचा प्रारंभ नुकताच करण्यात आला.
कडेगाव हे तालुक्यातील मुख्य ठिकाण असलेले शहर आहे. सध्या या शहराची वेगाने वाढ होत आहे. कडेगावात पूर्वी ग्रामपंचायत होती, आता नगरपंचायत झाली आहे. लोकांना चांगल्या सोयी-सुविधा देणे गरजेचे आहे. सरकारनेच सर्व काही केले पाहिजे, यापेक्षा लोकसहभागातून अनेक विकास कामे होऊ शकतात, हे अनेक गावांनी दाखवून दिलेले आहे. याचाच एक भाग म्हणून कडेगाव स्मार्ट सिटी बनवूया.
राजकारणविरहित ग्रुपच्यावतीने वृक्षारोपण, योगासन शिकवणी, गाव स्वच्छता मोहीम आदी कामे श्रमदानाने राबविण्यात आली आहेत. हायमास्ट
लॅम्पसाठी सर्वतोपरी मदत केल्याबद्दल डांगे परिवार आणि लिबर्टी ग्रुपचे अभिनंदन या सोशल मीडिया ग्रुपच्या आणि ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते राजाराम गरुड, चंद्रसेन देशमुख, गुलाम पाटील, सुरेशचंद्र थोरात, धनंजय देशमुख, संतोष डांगे, विजय शिंदे, वसंतराव गायकवाड, शिवाजीराव देशमुख, राजाराम डांगे, राजू जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, विजय गायकवाड, रवींद्र पालकर, विवेक भस्मे, उदयकुमार देशमुख, नितीन शिंदे, बी. के. गायकवाड, विनोद गोरे आदी उपस्थित होते.
हायमास्ट लॅम्प बसविण्याचा प्रारंभ करण्यात आला. पांडुरंग डांगे यांच्या स्मरणार्थ शिवाजी चौकाच्या मधोमध हायमास्ट एलईडी लॅम्प संतोष डांगे यांनी
दिला आहे, तर सुरेशबाबा देशमुख चौक येथे लिबर्टी ग्रुप व विजयदादा प्रतिष्ठान यांच्यावतीने मोठे सहा दिवे असणारा हायमास्ट लॅम्प देण्यात आला आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग डांगे, सुरेशबाबा देशमुख आणि विजयदादा देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
शहरातील डॉक्टर, इंजिनिअर, राजकीय नेतेमंडळी, पत्रकार यांच्या संघटनात्मक कामातून कडेगाव स्मार्ट सिटी बनवूया. वॉटस् अप् ग्रुपची स्थापना करण्यात आली असून यातून कडेगाव शहराच्या विकासासाठी योगदान द्यावे, हा त्यामागचा उद्देश आहे. या ग्रुपमधून लोकांना शहर विकासाबाबत चांगले संदेश देण्यात येत असून काही विकासकामे मार्गी लागलेली आहेत. यातूनच शहरातील दोन मुख्य चौकात हायमास्ट एलईडी लॅम्प बसविण्याचा प्रारंभ नुकताच करण्यात आला.
कडेगाव हे तालुक्यातील मुख्य ठिकाण असलेले शहर आहे. सध्या या शहराची वेगाने वाढ होत आहे. कडेगावात पूर्वी ग्रामपंचायत होती, आता नगरपंचायत झाली आहे. लोकांना चांगल्या सोयी-सुविधा देणे गरजेचे आहे. सरकारनेच सर्व काही केले पाहिजे, यापेक्षा लोकसहभागातून अनेक विकास कामे होऊ शकतात, हे अनेक गावांनी दाखवून दिलेले आहे. याचाच एक भाग म्हणून कडेगाव स्मार्ट सिटी बनवूया. राजकारणविरहित ग्रुपच्यावतीने वृक्षारोपण, योगासन शिकवणी, गाव स्वच्छता मोहीम आदी कामे श्रमदानाने राबविण्यात आली आहेत.
हायमास्ट लॅम्पसाठी सर्वतोपरी मदत केल्याबद्दल डांगे परिवार आणि लिबर्टी ग्रुपचे अभिनंदन या सोशल मीडिया ग्रुपच्या आणि ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते राजाराम गरुड, चंद्रसेन देशमुख, गुलाम पाटील, सुरेशचंद्र थोरात, धनंजय देशमुख, संतोष डांगे, विजय शिंदे, वसंतराव गायकवाड, शिवाजीराव देशमुख, राजाराम डांगे, राजू जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, विजय गायकवाड, रवींद्र पालकर, विवेक भस्मे, उदयकुमार देशमुख, नितीन शिंदे, बी. के. गायकवाड, विनोद गोरे आदी उपस्थित होते.