Diwali : सांगलीच्या बाजारपेठेला लक्ष्मी पावली, मोठी उलाढाल : जोरदार आतषबाजीत सण साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 04:57 PM2018-11-07T16:57:39+5:302018-11-07T16:58:56+5:30
सांगली शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी उधाणलेल्या गर्दीने विक्रम करीत बुधवारी मोठी उलाढाल करण्यास हातभार लावला. लक्ष्मीपूजना दिवशीच सांगलीच्या बाजारपेठांवर लक्ष्मीची कृपादृष्टी झाल्याचे चित्र दिसून आले.
सांगली : शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी उधाणलेल्या गर्दीने विक्रम करीत बुधवारी मोठी उलाढाल करण्यास हातभार लावला. लक्ष्मीपूजना दिवशीच सांगलीच्या बाजारपेठांवर लक्ष्मीची कृपादृष्टी झाल्याचे चित्र दिसून आले.
सकाळपासून सांगलीत मारुती रोड, हरभट रोड, स्टँड रोड, शिवाजी मंडई, कापड पेठ रोड, गणपती पेठ या प्रमुख बाजारपेठांमध्ये गर्दी होती. दिवसभर वाहतूकीची कोंडी अनुभवास आली. वाहतूक पोलिसांच्या कसरतीनंतरही वाहतुकीचा गोंधळ कायम राहिला. ठिकठिकाणी वादावादीचे प्रसंगही वाहतूक कोंडीमुळे घडले. या सर्व प्रकारात बाजारपेठा मात्र मालामाल झाल्या. सर्वत्र मोठी उलाढाल झाली.
झेंडूला भाव
झेंडूने लक्ष्मीपूजनादिवशी भाव खाल्ला. १०० ते १२० रुपये किलो दराने विक्री झाली. त्यामुळे विक्रेते, उत्पादकांना दिलासा मिळाला. शेवंती फुलाची विक्री २०० रुपये किलोने झाली