भूमीमध्ये पैशासाठी ठेवीदारांचे हेलपाटे, सांगलीतील कार्यालय सुरूच, पुणे, विजापूरची शाखा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 11:28 AM2017-12-23T11:28:46+5:302017-12-23T12:03:22+5:30

सांगली येथील कर्मवीर चौकातील भूमी प्रॉपकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळविण्यासाठी ठेवीदारांचे हेलपाटे सुरु आहेत. कंपनीच्या पुणे व विजापूर येथील शाखा बंद केल्या आहेत. गुन्हा दाखल होऊन चार दिवस होऊन गेले तरी कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक मनोज कदम व अन्य संचालकांचा शोध घेण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आलेले नाही.

In the land, depositors' helm of the house, Sangli office started, closed the branch of Pune, Vijapur | भूमीमध्ये पैशासाठी ठेवीदारांचे हेलपाटे, सांगलीतील कार्यालय सुरूच, पुणे, विजापूरची शाखा बंद

भूमीमध्ये पैशासाठी ठेवीदारांचे हेलपाटे, सांगलीतील कार्यालय सुरूच, पुणे, विजापूरची शाखा बंद

Next
ठळक मुद्देसांगलीतील भूमी प्रॉपकॉन प्रायव्हेट लिमिटेड कार्यालय सुरूचपैशाच्या व्याजातून पाटण (जि. सातारा) येथे प्लॉट घेऊन देण्याचे आमिष मनोज कदमसह संचालक पसारविश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सांगली : येथील कर्मवीर चौकातील भूमी प्रॉपकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळविण्यासाठी ठेवीदारांचे हेलपाटे सुरु आहेत. कंपनीच्या पुणे व विजापूर येथील शाखा बंद केल्या आहेत.

गुन्हा दाखल होऊन चार दिवस होऊन गेले तरी कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक मनोज कदम व अन्य संचालकांचा शोध घेण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आलेले नाही. कंपनीचे कार्यालय सुरु असले तरी, ठेवीदारांना एक रुपयाही दिला जात नाही.
 

ठेवीची रक्कम गुंतविल्यास त्याच्या व्याजातून प्लॉट घेऊन देणार, महिना बचत ठेव अशा योजना काढून कंपनीने लोकांना पैसे भरण्यास भाग पाडले. यासाठी एजंटांची नियुक्ती केली. इनाम धामणीच्या सुशिला पाटील यांनी स्वत:च्या तसेच सुनेच्या नावावर प्रत्येकी पाच लाख, अशी एकूण दहा लाखाची रक्कम २८ मे २०१४ रोजी गुंतविली होती.

तब्बल एक महिन्यानंतर कंपनीने त्यांना ठेवीच्या पावत्या दिल्या. एक वर्षाच्या मुदतीवर ठेव ठेवली होती. या पैशाच्या व्याजातून पाटण (जि. सातारा) येथे प्लॉट घेऊन देण्याचे आमिष कंपनीने दाखविले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांना प्लॉट दिला नाही. तसेच मुदत संपूनही ठेवीची रक्कम दिली नाही. त्यामुळे पाटील यांनी चार दिवसांपूर्वी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी मुख्य संशयित मनोज कदमच्या इनाम धामणी (ता. मिरज) येथील घरावर छापा टाकून झडती घेतली. पण तेथे काहीच सापडले नाही. गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागल्याने तो पसार झाला आहे. त्याच्याविरुद्ध नव्याने कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.

सध्या कार्यालयात चार महिला काम करीत आहेत. यामध्ये एक महिला व्यवस्थापक म्हणून आहे. गुरुवारी दिवसभर ठेवीदार कार्यालयात भेट देऊन गुंतवणूक केलेली रक्कम परत देण्याची मागणी करीत होते.

महिला कर्मचाऱ्यांकडून त्यांना, व्यवस्थापक मॅडम नाहीत, त्या दुपारी तीननंतर येतात, असे उत्तर दिले जात होते. महिला व्यवस्थापक आल्यानंतर काही ठेवीदारांनी त्यांची भेट घेऊन पैसे देण्याची मागणी केली. यावर त्यांनी अर्ज करण्यास सांगितले. परंतु पैसे लगेच मिळणार नाहीत. व्यवस्थापकीय संचालक मनोज कदम यांच्याशी चर्चा करुन पैसे दिले जातील, असे त्यांनी उत्तर दिले.

पोलिसांनी कंपनीच्या संचालकांचा शोध सुरु केला आहे. पण, त्यांचाही अजून सुगावा लागलेला नाही.
मैत्रेयतील नोकरीनंतर भूमी काढली. संशयित मनोज कदम हा मैत्रेय या कंपनीत लिपिक म्हणून काम करीत होता. या कंपनीनेही सांगलीत गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा घातला आहे.

याचा अजूनही पोलिस तपास सुरू आहे. मैत्रेयला टाळे लागल्यानंतर मनोज कदम याने स्वत:ची भूमी ही कंपनी काढली. पण त्याचीही कंपनी आर्थिक संकटात आली आहे. कंपनीचे महिन्याचे कलेक्शन कमी झाल्याने ठेवीदारांना पैसे देण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले. पण मनोज कदम यांनी दुसरा व्यवसाय सुरू केला आहे, त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून पैसे दिले जातील, असेही त्या ठेवीदारांना सांगत आहेत.

नऊ हजारासाठी दोन वर्षे टाळाटाळ

आरग (ता. मिरज) येथील एकाने प्रतिमहिना तीनशे रुपयांची गुंतवणूक केली आहे. २५ महिने त्याने पैसे भरले. कंपनीकडे साडेसात हजार रुपये जमा आहेत. व्याजासह कंपनी त्यांना नऊ हजार रुपये देणे लागते. दोन वर्षापूर्वी त्यांनी पैसे देण्याची मागणी केली.

कंपनीने पैसे भरल्याचे दिलेले प्रमाणपत्र जमा करुन घेतले; पण अजूनही पैसे दिले नाहीत. गुरुवारीही ते पैशासाठी कंपनीत आले होते; मात्र अजून दोन महिने लागतील, तसेच दोन टप्प्यात नऊ हजार रुपये दिले जातील, असे महिला कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले.

 

Web Title: In the land, depositors' helm of the house, Sangli office started, closed the branch of Pune, Vijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.