रेल्वेकडून मिळणार जमिनीचे पैसे...१६ गावांना फायदा-शेतकऱ्यांच्या लढ्याला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:48 PM2018-12-19T22:48:44+5:302018-12-19T22:49:03+5:30

स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी, रेल्वेचे अधिकारी यांची जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन कोरेगाव व कºहाड तालुक्यातील १६ गावांचे भूसंपादन करताना सातबारा

Land to get the money from the railways ... 16 villages benefit- Farmers fight to be successful | रेल्वेकडून मिळणार जमिनीचे पैसे...१६ गावांना फायदा-शेतकऱ्यांच्या लढ्याला यश

रेल्वेकडून मिळणार जमिनीचे पैसे...१६ गावांना फायदा-शेतकऱ्यांच्या लढ्याला यश

Next
ठळक मुद्देइतर गावांसाठी संघर्ष सुरूच राहणार

कोपर्डे हवेली : स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी, रेल्वेचे अधिकारी यांची जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन कोरेगाव व कºहाड तालुक्यातील १६ गावांचे भूसंपादन करताना सातबारा उताºयानुसार जमिनीचा मोबदला देण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने दाखवली आहे. मात्र, इतर गावांचे काय? असा प्रश्न निर्माण झाल्याने हा लढा असाच एकसंघ लढायचा निर्धार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्यासह शेतकºयांनी केला आहे.

शेरे, वडगाव, गोपाळनगर, कोरेगाव, टेंभू, सयापुर, बाबरमाची, पार्ले, कामरवाडी, जुने कवठे या गावाचे पूर्वीचे कागदपत्र सापडत नसल्याचे रेल्वे अधिकाºयांनी मान्य केले आहे. त्यामुळे या गावातील शेतकºयांच्या रेल्वेलगतच्या शेतीचा सातबारा ग्राह्य धरून संयुक्तपणे मोजणी करण्यात येणार आहे. जेवढे क्षेत्र जाणार तेवढे भूसंपदनाचे क्षेत्र ठरणार आहे. यापूर्वी रेल्वेचे अधिकारी शंभर ते तीनशे फूट रेल्वेची जागा शेतकºयांच्या शेतात आहे, असे सांगत होते. परंतु स्वभिमानी शेतकरी संघटनेच्या लढ्याने रेल्वे प्रशासन खडबडून जागे होऊन कागदपत्रे मान्य नसल्याचे कबूल केले आहे. तर इतर गावांच्या बाबतीत रेल्वे प्रशासनाकडून कागदपत्रे शोधण्याचे काम सुरू आहे, असे सांगण्यात आले.

या गावामध्ये कोपर्डे हवेली, शेणोली, हजारमाची, विरवडे, नडशी, यशवंतनगर, शिरवडे, मसूर, कोणेगाव, खराडे, कालगाव, उत्तर कोपर्डे आदी गावांचा सामावेश आहे. सर्व गावांना मोबदला मिळत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहणार आहे.

कागदपत्रे दाखवा, मग काम सुरू करा!
जोपर्यंत रेल्वे प्रशासन जमिनीची कागदपत्रे दाखवत नाही, तोपर्यंत काम सुरू करू देणार नसल्याचा निर्धार शेतकºयांनी केला आहे, अन्यथा योग्य मोबदला देऊन सुरू करावे, अशा रेल्वे प्रकल्पबाधित शेतकºयांच्या भावना आहेत.


शेतकºयांच्या मागण्या
प्रकल्पग्रस्त दाखला देण्यात यावा
रेल्वेत नोकरी द्यावी
रेल्वेचा रस्ता वापण्याचा शेतकºयांना हक्क द्यावा
पुलांची उंची वाढविण्यात यावी

 

सर्व गावांतील शेतकºयांचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहणार. भूसंपादनाचा मोबदला रेडी रेकनरनुसार नको तर चालू बाजारभावाने मिळावा, यासाठी आग्रही राहणार आहे.
- सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष , स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: Land to get the money from the railways ... 16 villages benefit- Farmers fight to be successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.