‘महसूल’च्या वरदहस्तामुळे भूखंड माफियाराज: इस्लामपुरातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 11:17 PM2018-07-24T23:17:25+5:302018-07-24T23:17:28+5:30

Land of MafiaRaj: Illustration from Islampur | ‘महसूल’च्या वरदहस्तामुळे भूखंड माफियाराज: इस्लामपुरातील चित्र

‘महसूल’च्या वरदहस्तामुळे भूखंड माफियाराज: इस्लामपुरातील चित्र

Next

अशोक पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर शहराच्या चारही दिशेला फकिरांची समाधीस्थळे आहेत. मात्र महसूल विभागातील काहींनी काळ्याचे पांढरे करून या देवस्थानांच्या जागांची खरेदीपत्रे केली आहेत. राजेबागेश्वर देवस्थानाचीही अशीच परिस्थिती आहे. भोई समाजाने पूजाअर्चेच्या निमित्ताने त्यांच्या नावावर असलेल्या भूखंडांची विल्हेवाट लावली आहे.
शहराच्या दक्षिणेस राजेबागेश्वर देवस्थान आहे. गुढीपाडव्याला येथे मोठी यात्रा भरते. इस्लामपूर-बहे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या जागांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे राजेबागेश्वर परिसरातील मोकळ्या जागांवर धनदांडग्यांचा डोळा आहे. इस्लामपूर शहराला गुंठेवारीचा प्रश्न भेडसावत आहे. नियोजित विकास आराखडा लाल फितीत अडकला आहे. त्यामुळे नगरपालिकेपासून महसूल विभागातील वरदहस्तामुळे भूखंड माफिया फोफावले आहेत. सर्वसामान्यांनी कर्जे काढून खरेदी केलेल्या जागांवर काहींनी अतिक्रमण करून तारेची कुंपणे घातली आहेत. पोलिसांत तक्रारी करूनही, संबंधितांवर कारवाई झालेली नाही. उलट न्यायालयीन लढा देण्याचा सल्ला दिला जात आहे.
देवस्थान परिसरात पुजाºयांच्या उदरनिर्वाहासाठी शेतजमीन दिली आहे. परंतु मंदिरांचा विकास होण्यापेक्षा पुजाºयांनी स्वत:चेच उत्पन्न वाढवून घेतले आहे. याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. ज्यांच्याकडे या मंदिराची देखभाल व पूजेचा मान आहे, तेच आता मालक झाले आहेत. ज्या देवस्थानच्या नावाने जमिनी आहेत, त्या बेकायदेशीरपणे विकल्या जात आहेत. राजेबागेश्वर परिसरात भोई समाजाने पूजेचा मान घेऊन केवळ मलिदा लाटण्याचाच उद्योग केला आहे. ही जागा भोई समाजाची असल्याचा दावा करणारे अशोक भोई आणि डॉ. राहुल कुंडले यांनी घूमजाव केले आहे.

Web Title: Land of MafiaRaj: Illustration from Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.