लेंगरेच्या तरुणास पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:37 AM2021-06-16T04:37:03+5:302021-06-16T04:37:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : जर्मनीत डॉक्टर असल्याचे भासवून सोशल मीडियाव्दारे मुंबईतील वकील महिलेला १४ लाख ९२ हजार रुपयांचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : जर्मनीत डॉक्टर असल्याचे भासवून सोशल मीडियाव्दारे मुंबईतील वकील महिलेला १४ लाख ९२ हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी विटा पोलिसांनी अटक केलेल्या वैभव सुरेश शिंदे (वय २९, रा. लेंगरे, ता. खानापूर) या तरुणास शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
लेंगरे येथील वैभव शिंदे याने सोशल मीडियाव्दारे बनावट खाते तयार करून जर्मनी येथे डॉक्टर असल्याचा बनाव करून फेसबुकवर मुंबईतील महिला वकिलाला रिक्वेस्ट पाठविली होती. त्यावेळी महिला वकिलाने ती स्वीकारली. त्यानंतर या दोघांत इन्स्टाग्राम व व्हॉट्सअॅपव्दारे मैत्री झाली.
त्यावेळी शिंदे याने कोरोनामुळे नातेवाईक आजारी असल्याचे सांगून तिच्याकडून वेळोवेळी १४ लाख ९२ हजार रुपये उकळले. त्यानंतर कालांतराने त्याने सोशल मीडियावरील संपर्क बंद केला.
त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने विटा पोलिसांत संशयित शिंदे याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला. त्यास शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
फोटो - १५०६२०२१-विटा-वैभव शिंदे, लेंगरे (संशयित).