बंदी आदेश झुगारून गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसरचा मारा; सांगलीतील दहा मंडळांवर गुन्हे

By घनशाम नवाथे | Published: September 18, 2024 07:23 PM2024-09-18T19:23:21+5:302024-09-18T19:23:40+5:30

पदाधिकारी, लाईट मालकासह ३३ जण कारवाईच्या फेऱ्यात

Lasers fired at processions in defiance of ban orders; Crimes against ten circles in Sangli | बंदी आदेश झुगारून गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसरचा मारा; सांगलीतील दहा मंडळांवर गुन्हे

बंदी आदेश झुगारून गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसरचा मारा; सांगलीतील दहा मंडळांवर गुन्हे

सांगली : गणेश विसर्जन मिरवणुकीत जिल्हाधिकाऱ्यांचा बंदी आदेश झुगारून लेसर लाईटचा मारा करणाऱ्या दहा गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, लाईट मालक यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. दहा मंडळांचे पदाधिकारी आणि लाईट मालक अशा ३३ जणांविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाणे आणि संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले.

लेसर लाईटमुळे डोळ्यांना इजा होत आहेत. नेत्ररोगतज्ज्ञांच्या संघटनेने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन बंदीची मागणी केली. कोल्हापुरात कार्यकर्त्याच्या डोळ्याला इजा झाली होती. त्यानंतर तेथे बंदी आदेश लागू केला. त्यामुळे सांगली पोलिसांनी देखील जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून बंदी आदेश लागू करण्याची विनंती केली. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी १४ सप्टेंबरपासून लेसर लाईटचा मिरवणुकीत वापर करण्यास बंदी घातली. त्याचा आदेश प्रसिद्ध केला.

जिल्हाधिकारी यांचा बंदी आदेश झुगारून सांगलीत नवव्या दिवशीच्या मिरवणुकांमध्ये काहींनी लेसर किरणांचा मारा केला. त्याबाबत पोलिसांनी नोंदी घेत, व्हिडीओ चित्रीकरण केले. त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी नऊ मंडळांचे पदाधिकारी, संजयनगर पोलिसांनी एका मंडळाविरुद्ध कारवाई केली. मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच लेसर मालक यांच्यावर गुन्हे दाखल केले. एकूण ३३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

शिवमुद्रा मंडळ- शुभम सतीश शिरगावकर, अफताब बागवान, ईगल मंडळ- सुमित कुंभोजकर, रोहित दत्तात्रय कोळी, रियालन्स डिजिटल- शिवम श्रावण जाधव, सूर्यकांत पाटील, विश्वसंघर्ष मंडळ- नितीन किसन कलगुटगी, नीलेश शिवाजी कलगुटगी, अष्टविनायक मंडळ- विशाल आप्पासाहेब वडर, संजय सिद्धू वडर, जगदंब युवा प्रतिष्ठान- मोसीन फकीर जमादार, बलभीम मंडळ- पारस सदाशिव दोडमणी, रमेश दिलीप आवळे, स्वस्तिक चौक- गणेश महादेव जाधव, दीपक महादेव माळी, स्वागत मंडळ- गणेश आनंदराव सटाले, सुधाकर सूर्यकांत चंदनशिवे, एकता मंडळ- ऋषिकेश दशरथ शिंदे, वैभव खोत.

या लेसर मालकांवरही कारवाई

सागर शिवाजी जगताप, शामराव नागे, ओंकार कोठावळे, अभिषेक महादेव खेमलापुरे, ओंकार दत्तात्रय गवंडी, सुशांत सुभाष देसाइॅ, अभिजित अशोक माळी, वासुदेव सुनील कांबळे, वैभव राजेंद्र मुंडे, मनोज अनिल घाटगे, निखिल किरण परदेशी, सोमनाथ धडे, सोहेल गौस मोमीन

Web Title: Lasers fired at processions in defiance of ban orders; Crimes against ten circles in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.