कवठेमहांकाळमध्ये ‘एनएसयुआय’चा मोर्चा

By admin | Published: November 6, 2015 11:44 PM2015-11-06T23:44:50+5:302015-11-06T23:54:43+5:30

तहसीलदारांना निवेदन : दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क परत देण्याची मागणी

In the last few days, the NCU Front | कवठेमहांकाळमध्ये ‘एनएसयुआय’चा मोर्चा

कवठेमहांकाळमध्ये ‘एनएसयुआय’चा मोर्चा

Next

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथे विविध शैक्षणिक मागण्यांसाठी तालुकाध्यक्ष विशाल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थ्यांनी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी निवासी नायब तहसीलदार नागेश गायकवाड यांना निवेदन दिले़
सकाळी दहा वाजता पीव्हीपी महाविद्यालयापासून मोर्चाला सुरूवात झाली़ मोर्च्यात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ‘शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘भाजप सरकार हाय हाय’, ‘शैक्षणिक फी परत द्या’ ‘एसटी पास मोफत द्या’, ‘कोण म्हणतंय देत न्हाय, घेतल्याशिवाय राहत न्हाय’, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला़ मुख्य रस्त्यावरून एसटी स्टँड, अंबिका कॉर्नर, काँग्रेस भवन मार्गे मोर्चा तहसील कार्यालयाच्या आवारात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला़
यावेळी एनएसयुआयचे तालुकाध्यक्ष विशाल शिंदे म्हणाले की, भाजपचे सरकार पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दुजाभावाची वागणूक देत आहे. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना अद्याप शैक्षणिक फी परत दिलेली नाही. तसेच एसटी पासही मोफत दिला नाही. भाजपचे सरकार विद्यार्थ्यांचे प्रश्न गांभीर्याने घेत नाही़ गेंड्याची कातडी पांघरलेल्या या सरकारला वठणीवर आणण्यासाठी कवठेमहांकाळसारख्या दुष्काळी भागातून आम्ही एनएसयुआयतर्फे आंदोलन करणार आहोत़
यावेळी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना एसटी पास मोफत द्यावा, त्यांची शैक्षणिक फी परत द्यावी आदी मागण्यांचे निवेदन एनएसयुआयचे तालुकाध्यक्ष विशाल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवासी नायब तहसीलदार नागेश गायकवाड यांना देण्यात आले़
या मोर्च्यात आकाश घोरपडे, विकास शिंदे, शिवाजी सरगर, अस्मिता देशमुख, अंजली शिंदे, प्रियांका वाघमारे, योगिता इंगळे, शुभम भोरे, सूरज शेजाळ, प्रज्ज्वल पाटील, युवराज पाटील, आशू पाटील, विशाल जाधव, अजिंक्य कारंडे, प्रशांत जगताप यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
सरकारला धडा शिकवू
भाजप सरकारने डिसेंबरअखेर दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना एसटी पास मोफत दिला नाही, तसेच चालू शैक्षणिक वर्षात शैक्षणिक फी परत दिली नाही, तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हाध्यक्ष राजीव मोरे यांच्या सहकार्याने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढून भाजप सरकारला धडा शिकवू, असा इशाराही विशाल शिंदे यांनी दिला़

Web Title: In the last few days, the NCU Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.