‘क्रांती’चा अंतिम ऊसदर ३३५५ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:07 AM2017-10-02T00:07:12+5:302017-10-02T00:07:12+5:30

Last revolution of 'Kranti' Rs 3355 | ‘क्रांती’चा अंतिम ऊसदर ३३५५ रुपये

‘क्रांती’चा अंतिम ऊसदर ३३५५ रुपये

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कुंडल : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखान्यास २०१६-१७ मध्ये गळितास आलेल्या उसाला ३ हजार ३५५ रुपये अंतिम दर देत असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी कारखान्याच्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप पाटील, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, उदय लाड, दिलीप लाड, माजी उपसरपंच राजेंद्र लाड, भीमराव महिंद, आदी मान्यवर उपस्थित होते. अरुण लाड म्हणाले, मागील गळीत हंगामात एफआरपीपेक्षा ८१९ रुपये जादा दर दिला आहे. साखर उतारा १२.५५ टक्क्यांप्रमाणे २ हजार ५३६ रुपये होत असताना, ३ हजार ३५५ रुपये दर दिला असून, यापैकी २ हजार ९३६ रुपये शेतकºयांना अदा केले आहेत. आता उर्वरित ३६९ रुपये दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यावर वर्ग करीत आहोत. सभासदांना दहा रुपये दराने दहा किलो साखर देऊ केली आहे. तसेच कर्मचाºयांना २८ टक्के बोनस, तर हंगामी कामगारांना कारखाना बंद काळात निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे. याबरोबरच कार्यक्षेत्रात ५८ गावांत ३६ हजार ७९१ वृक्षांची लागवड केली आहे. कार्यक्षेत्रात एलईडी दिव्यांचे वाटप केले आहे. इतर अनेक सामाजिक उपक्रम कारखान्यामार्फत राबविले जात आहेत. गतवर्षी निडवा उसाला अंतिम दरापेक्षा १०० रुपये जास्त दिले आहेत. यावर्षी को-जनरेशन प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत आहे. एकूण १९.७० मेगावॅट वीजनिर्मिती केली आहे. आसवनी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प प्रदूषणविरहित असून, देशातील सर्वोच्च तंत्रज्ञानाचा नमुना आहे. यंदा हा प्रकल्प चालू होणार आहे.
ऊसविकास सुविधांचा वापर करुन कार्यक्षेत्रातील शेतकºयांनी एकरी उत्पन्न वाढवले आहे. हुमणी कीड नियंत्रणासाठी कारखान्याने यशस्वी प्रयत्न केले आहेत. शासनाने ऊस पिकासाठी ठिबक अनिवार्य केले आहे. त्यामुळे कारखान्याने ठिबकसाठी एकरी सात हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. शासन ऊस शेतीबाबत उदासीन आहे. त्यामुळे शेतकºयांनी कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही लाड यांनी केले. जयप्रकाश साळुंखे यांनी स्वागत, तर पोपट संकपाळ यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे यांनी विषय पत्रिका वाचन, तर वित्त अधिकारी शामराव जाधव व आप्पासाहेब कोरे यांनी अहवाल वाचन केले.
दिलीप लाड, हिम्मतराव पवार, अनिल लाड यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक, सचिव वसंतराव लाड, पंचायत समितीचे उपसभापती अरुण पवार, आर. एम. पाटील, दिनकर लाड, कुंडलिक एडके, अशोक पवार, व्ही. वाय. पाटील, नंदाताई पाटील यांच्यासह पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वजनात फरक पडल्यास लाभाचे बक्षीस!
कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी गळितास येणाºया उसाच्या वजनात फरक पडला, तर एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले. कारखान्याला देशातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वानुमते अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

Web Title: Last revolution of 'Kranti' Rs 3355

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.