सीसीटीव्ही सर्व्हेलन्स व पीए सिस्टीमचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 04:30 PM2020-01-27T16:30:44+5:302020-01-27T16:34:29+5:30

पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सीसीटीएनएस व पीए प्रणालीचे लोकार्पण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

Launch of CCTV Surveillance and PA System | सीसीटीव्ही सर्व्हेलन्स व पीए सिस्टीमचे लोकार्पण

सीसीटीव्ही सर्व्हेलन्स व पीए सिस्टीमचे लोकार्पण

Next
ठळक मुद्देसीसीटीव्ही सर्व्हेलन्स व पीए सिस्टीमचे लोकार्पणप्रजासत्ताक दिनाचा 70 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सीसीटीएनएस व पीए प्रणालीचे लोकार्पण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

ट्राफिकला शिस्त लावण्यासाठी व कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने ही प्रणाली अत्यंत महत्वपूर्ण आहे असे सांगून या प्रणालीबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी अवगत केले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले आदि उपस्थित होते.

राज्यातील जनतेला सुखी, समाधानी आणि चिंतामुक्त करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी, कामगार, कष्टकरी यांचे हित डोळ्यासमोर ठेवून लोकाभिमुख आणि गतीमान प्रशासनासाठी जनतेच्या वाढलेल्या अपेक्षा निश्चित पूर्ण करण्यात येतील, असे सांगून आर्थिकदृष्‍ट्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त नव्हेच तर चिंतामुक्त करण्याच्या निर्धाराने 2 लाख रूपये पर्यंतचे पीक कर्ज माफी करणारी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली आसून याचा जिल्ह्यातील जवळपास 93 हजार 290 शेतकऱ्यांना सुमारे 722 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ मिळणार आहे. या योजनेची गतीमान अंमलबजावणी करण्याचे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप सिंह गिल, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे आदि मान्यवर उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 2 लाखापर्यंतचे 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेले व 30 सप्टेंबर 2019 रोजी थकीत असलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि अल्पमुदत पीक पुनर्गठित कर्ज माफ होणार आहे. याबरोबरच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीतही शासन सकारात्मक निर्णय घेणार आहे.

गोरगरीब जनतेला केवळ 10 रूपयात पोटभर जेवण मिळावे यासाठी शिवभोजन योजना अंमलात आणली असून जिल्ह्यातील जनतेला ती उपयुक्त ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील पूरबाधीत जनतेला सर्व ती मदत करण्यास शासन कटिबध्द असल्याचे सांगून संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिक सर्तक करण्यात आले आहे.

पूरबाधित 52 गावांतील तरूणांना आपत्ती निवारणाचा शास्त्रशुध्द प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार यांत्रिक बोटी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे असेही त्यांनी सांगितले.

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांचा आराखडा आतापासूनच तयार करण्याचे निर्देश प्रशासनास देवून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, दुष्काळी भागातील जनतेचा पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पांना निश्चितपणे गती देण्यात येईल. जिल्ह्यातील सर्वच उपसा सिंचना योजनांना गती देवून दुष्काळी भागातील शेवटच्या माणसाला पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी देण्याच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील.

जिल्हा वार्षिक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. रेशनकार्ड संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्यात मोहीम राबविण्यात येणार असून यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागेल. जातीचे दाखले शाळेतच मिळावे यासाठीही मोहीम राबविण्यात येईल. यावेळी त्यांनी मतदान जागृतीच्या दृष्टीने 26 जानेवारीपासून 10 फेब्रुवारीपर्यंत लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येत असून आगामी सर्व निवडणुकांमध्ये सर्व मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून सहभाग घ्यावा. तसेच, स्वत:बरोबर इतर सहकाऱ्यांनाही मतदानाच्या कर्तव्यासाठी प्रोत्साहीत करावे, असे आवाहन केले.

आजच्या संचलनामध्ये पोलीस दल, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, जिल्हा वाहतूक विभाग, अग्निशमन दल, पोलीस बँड पथक, दंगल नियंत्रण पथक, श्वान पथक, जेलकैदी पथक वाहन, बाँबशोधक पथक, सामाजिक वनिकरण चित्ररथ, लोकशाही पंधरवडा चित्ररथ, सायकलस्वारांचे पथक, विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचे पथक, स्वच्छता पाणी पुरवठा विभागाचा चित्ररथ, पत्रकार दीपक चव्हाण यांचा प्लास्टीक मुक्तीचा संदेश देणारा शोले स्टाईल चित्ररथ यांचा समावेश होता.

संचलनानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासह सर्वच उपस्थितांनी भरभरून दाद दिली. यात ज्युबिली इंग्लीश कन्या शाळा मिरज यांनी सादर केलेला शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत लक्षवेधी ठरला. पालकमंत्री जयंत पाटील यांनी यामधील सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

प्रारंभी प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर पालकमंत्री जयंत पाटील यांनी परेड निरीक्षण केले. त्यानंतर पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते विविध मान्यवरांना उत्कृष्ट कामगिरीबध्दल गौरविण्यात आले.

या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्वाती देशमुख, उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) बाबासाहेब वाघमोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, उपजिल्हाधिकारी (महसूल) विजया यादव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, जिल्हा नियोजन अधिकारी ज. द. मेहेत्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच कर्मचारी स्वातंत्र्य सैनिक, अनेक मान्यवर पदाधिकारी, दलित मित्र, शिक्षक, नागरिक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन विजयदादा कडणे आणि पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांनी केले.



 

Web Title: Launch of CCTV Surveillance and PA System

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.