सांगलीत बाजार समितीत नव्या हळद सौद्यांचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 10:30 AM2021-01-27T10:30:34+5:302021-01-27T10:36:03+5:30
Agriculture Sector market sangli- कृषि उत्पन्न बाजार समितीत नविन हळद सौदयांचा शुभारंभ सभापती दिनकर पाटील यांच्याहस्ते सोमवारी सकाळी झाला. गणपती जिल्हा कृषि अौद्योगिक सोसायटीत हा कार्यक्रम झाला. बावची (ता. वाळवा ) येथील हळद उत्पादक शेतकरी सतीश विष्णू कोकाटे यांच्या राजापूरी हळदीला ११२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
सांगली : कृषि उत्पन्न बाजार समितीत नविन हळद सौदयांचा शुभारंभ सभापती दिनकर पाटील यांच्याहस्ते सोमवारी सकाळी झाला. गणपती जिल्हा कृषि अौद्योगिक सोसायटीत हा कार्यक्रम झाला. बावची (ता. वाळवा ) येथील हळद उत्पादक शेतकरी सतीश विष्णू कोकाटे यांच्या राजापूरी हळदीला ११२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
हळद सौद्यामध्ये कमीत कमी ५०००) व जास्तीजास्त ११२०० इतका दर पहिल्या दिवशी मिळाला. सौदयाच्या शुभारंभप्रसंगी व्यापारी प्रतिनिधी संचालक शीतल पाटील, मुजीर जांभळीकर, हमाल प्रातिनिधी बाळासाहेब बंडगर, संचालक जीवन पाटील, अडत व्यापारी मनोहर सारडा, गोपाळ मर्दा, माजी महापौर सुरेश पाटील, सत्यनारायण अटल, मधूकर काबरा, राजेंद्र मेणकर, हमाल पंचायतीचे सचिव विकास मगदूम बाजार समितीचे प्रभारी सचिव आर. ए. पाटील, हळद सोदे विभाग प्रमुख एम. के. रजपूत यांच्यासह अडते, व्यापारी, हमाल, तोलाईदार व शेतकरी उपस्थित होते.
सभापती पाटील यांनी आवाहन केले की, नव्या हंगामात हळदीला चांगला दर मिळू लागला आहे. सांगलीच्या हळदीची गुणवत्ता चांगली असल्याने जगभरातून मागणी आहे. त्यामुळे शेतकर्यांनी जास्तीजास्त हळद विक्रीसाठी आणावी. विविध बँकांतर्फेहळद व बेदाणा शेतमाल तारण कर्ज योजना सुरु आहे, तिचाही लाभ घ्यावा.