कपिल पाटील यांच्या हस्ते सावित्री-फातिमा कॅशलेस योजनेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:27 AM2020-12-29T04:27:06+5:302020-12-29T04:27:06+5:30
शिक्षक भारतीचे सांगली जिल्हाध्यक्ष सुधाकर माने यांनी स्वागत केले. आमदार कपिल पाटील म्हणाले. ही योजना ही शिक्षकाच्या कुटुंबाची काळजी ...
शिक्षक भारतीचे सांगली जिल्हाध्यक्ष सुधाकर माने यांनी स्वागत केले. आमदार कपिल पाटील म्हणाले. ही योजना ही शिक्षकाच्या कुटुंबाची काळजी घेणारी मेडिकल क्लेम योजना आहे. चांगला भारतीय नागरिक घडविण्याची जबाबदारी ही शिक्षकांची आहे. शिपाई भरतीबाबत काढलेला शासननिर्णय मागे घेण्यास भाग पाडू. शिक्षणक्षेत्रात अन्यायकारक बदल घडवण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. त्याविराेधात एकत्र येऊन लढा उभारू.
यावेळी शिक्षक भारती प्राथमिकचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, माध्यमिकचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी सावित्री-फातिमा कॅशलेस योजनेबाबत मार्गदर्शन केले. शिक्षक भारती प्राथमिकचे जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे व महानगर अध्यक्ष आरिफ गोलंदाज यांनी शिक्षकांच्या विविध समस्या मांडल्या. कडेगाव तालुकाध्यक्ष प्रवीण पवार व शरद शिदे यांचा गौरव करण्यात आला. पलूस येथील सहाय्यक शिक्षक सलीम सय्यद यांचे गेल्या महिन्यात आकस्मित मृत्यू झाले. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने सांगली जिल्हा ऊर्दू शिक्षक भारतीमार्फत त्यांच्या कुटुंबाला मदत म्हणून दोन लाख सात हजार रुपये आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते व राज्याध्यक्ष ऊर्दू मुस्ताफ पटेल याच्या वतीने प्रदान करण्यात आले. यावेळी मुश्ताक पटेल, सुधाकर माने, मोहन पुजारी, संजय पवार, आशिष यमगर, कृष्णा पोळ, देवेंद्र पाटील, बाजीराव जाधव, महेश कोळी, गंगाधर कोरे, प्रवीण पवार, शरद शिंदे, महादेव खोत, नितीन यादव, सुरेश कदम, दिगंबर सावंत उपस्थित होते. फारूक मोमीन यांनी आभार मानले.
फाेटाे : २८ कडेगाव १
ओळ : कडेगाव यथे आमदार कपिल पाटील याच्या हस्ते सावित्री-फातिमा कॅशलेस योजनेस प्रारंभ करण्यात आला.