महिला काँग्रेसच्या एक गाव कोरोनामुक्त उपक्रमाची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:30 AM2021-05-25T04:30:49+5:302021-05-25T04:30:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या तिसाव्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या ‘एक गाव कोरोनामुक्त’ ...

Launch of a village coronamukta initiative of Mahila Congress | महिला काँग्रेसच्या एक गाव कोरोनामुक्त उपक्रमाची सुरुवात

महिला काँग्रेसच्या एक गाव कोरोनामुक्त उपक्रमाची सुरुवात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या तिसाव्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या ‘एक गाव कोरोनामुक्त’ या उपक्रमाची सुरुवात मिरज तालुक्यातील कांचनपूर या गावातून करण्यात आली. या वेळी ग्रामस्थांना सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप प्रदेश सरचिटणीस ॲड. मनीषा रोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन ऑनलाइन करण्यात आले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुष्मिता देव, प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, महाराष्ट्राच्या प्रभारी आमदार प्रणिती शिंदे, महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, राजस्थानच्या महिला बाल विकास मंत्री ममता भूपेश यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.

या वेळी प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष शैलजा पाटील, जिल्हा अध्यक्ष ॲड. मनीषा रोटे यांच्या उपस्थितीत एक गाव कोरोनामुक्त करण्याची घोषणा करण्यात आली. गावातील लोकांची तपासणी करून पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे. कोरोना झालेल्या लोकांचे मनोधैर्य वाढविणे, औषधांची व्यवस्था करणे, कोरोनाबाबत समुपदेशन आणि जनजागृती करणे अशा प्रकारचे काम या उपक्रमामध्ये होणार आहे.

Web Title: Launch of a village coronamukta initiative of Mahila Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.