कासेगावात राष्ट्रवादीविरोधात आघाडी आक्रमक

By admin | Published: January 12, 2017 11:58 PM2017-01-12T23:58:52+5:302017-01-12T23:58:52+5:30

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला : पंचायत समितीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी; उमेदवारांचा शोध युध्दपातळीवर; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Leading aggressor against NCP in Kassegaon | कासेगावात राष्ट्रवादीविरोधात आघाडी आक्रमक

कासेगावात राष्ट्रवादीविरोधात आघाडी आक्रमक

Next


प्रताप बडेकर ल्ल कासेगाव
वाळवा तालुक्यातील कासेगाव जिल्हा परिषद गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादीविरोधात भाजप, शिवसेना, स्वाभिमानी संघटना व इतर पक्ष आक्रमक झाले आहेत. इस्लामपूर पालिकेप्रमाणे येथेही सर्व पक्ष एकत्र येऊन विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीला आव्हान देणार का?, हा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या सर्वांचीच उमेदवार शोधण्यासाठी धावपळ सुरू आहे.
सध्या कासेगाव जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. कासेगाव पंचायत समिती गण खुला झाला आहे. त्यामुळे येथे इच्छुकांची भाऊगर्दी आहे. नेर्ले गण इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाला आहे.
गत निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील येथून राज्यात विक्रमी मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे या गटात राष्ट्रवादीचाच बोलबाला आहे. आता जिल्हा पषिदेसाठी राष्ट्रवादीकडून नेर्ले येथील जनार्दनकाका पाटील यांच्या कन्या सौ. संगीता संभाजी पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांच्या पत्नी सौ. नंदा पाटील व सहकार बोर्डाचे माजी उपाध्यक्ष दिलीप पाटील यांच्या पत्नी सौ. मंदा पाटील यांची नावे आघाडीवर आहेत. पंचायत समिती सदस्या सौ. राजेश्वरी पाटील, देवराज पाटील यांच्या पत्नी सौ. सुप्रिया पाटील, कासेगावच्या सरपंच सौ. नंदाताई पाटील, नेर्ले येथील डॉ. स्मिता सचिन पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत.
विरोधी विकास आघाडीकडून येलूरच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सौ. मीनाक्षी महाडिक, कृष्णा कारखान्याचे संचालक गिरीश पाटील यांच्या पत्नी धनश्री पाटील व सुनीता दीपक पाटील, मंगल मोहन पाटील यांची नावे चर्चेत आहेत. कासेगाव येथील शिवसेनेचे नेताजी पाटील यांच्या पत्नी सौ. वैशाली पाटील यांचे शिवसेनेतून, यशवंत ग्लुकोजचे संचालक स्वा.सै. बापूसाहेब शिंदे यांच्या नात सून सौ. पल्लवी योगेश शिंदे, नेर्ले येथील शिवाजी केनचे संचालक एस. व्ही. पाटील यांच्या पत्नी वासंती सूर्यकांत पाटील यांचे नाव भाजपकडून चर्चेत आहे. काँग्रेसकडून जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष जयकर कदम यांच्या पत्नी सौ. अंजली कदम यांचेही नाव चर्चेत आहे.
कासेगाव गणात राष्ट्रवादीकडून ‘राजारामबापू’चे संचालक उदयसिंह पाटील, किरण पाटील, सुजित पाटील, अभिजित तोडकर, धोत्रेवाडीचे प्रदीप माने-पाटील यांची नावे चर्चेत आहेत. विरोधी गटातून भाजपकडून अ‍ॅड. संदीप पाटील, पांडुरंग वाघमोडे, जयप्रकाश रणदिवे, अ‍ॅड. कौस्तुभ मिरजकर, मंदार रणदिवे, विजय पाटील, शंकर बागल, तर शिवसेनेकडून नेताजी पाटील, उमेश जगताप यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसकडून जयदीप पाटील, हौसेराव पाटील, तर अपक्ष म्हणून सुरेश माने इच्छुक आहेत. संभाजी ब्रिगेडचे सुयोग औंधकर हेही उत्सुक आहेत. नेर्ले गणातून राष्ट्रवादीकडून रेश्मा मुल्ला, काँग्रेसकडून मोहिनी मारुती जांभळे, तर विकास आघाडीतून सिंधूताई हणमंत कुंभार यांची नावे आहेत. यापूर्वी कासेगाव गटात कासेगाव, वाटेगाव, काळमवाडी, केदारवाडी, शेणे, महादेववाडी, माणिकवाडी आदी गावांचा समावेश होता.
जि. प. लढत : लक्षवेधी होणार
कासेगाव गणातून देवराज पाटील यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह होत आहे. पंचायत समितीत राष्ट्रवादीची सत्ता आल्यास उपसभापतीपदी देवराज पाटील यांची वर्णी निश्चित मानली जात आहे. नेर्ले गाव या मतदार संघात आल्याने जिल्हा परिषदेसाठी मीनाक्षी महाडिक यांच्या नावाची चर्चा सुरू असून, तसे झाले तर या मतदार संघात लक्षवेधी लढत पाहण्यास मिळणार आहे.

Web Title: Leading aggressor against NCP in Kassegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.