अग्रण धुळगावमध्ये ओढा पात्र रुंदीकरण, खोलीकरणास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:27 AM2021-04-24T04:27:07+5:302021-04-24T04:27:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कवठेमहांकाळ : अग्रणी नदी पुनर्जीवन प्रकल्पांतर्गत अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे जलबिरादरीतर्फे नांगोळे ओढा पात्राचे खोलीकरण ...
लोकमत न्यूज नेटवर्क कवठेमहांकाळ : अग्रणी नदी पुनर्जीवन प्रकल्पांतर्गत अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे जलबिरादरीतर्फे नांगोळे ओढा पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण सुरू करण्यात आले. मंडळाधिकारी उत्तम कांबळे, तलाठी राजकुमार बडोले यांच्या हस्ते प्रारंभ झाला.
मुंबईतील शालिना लॅबोरेटरीजने याकामी अर्थसाहाय्य केले आहे. नांगोळे, पिंपळवाडी आणि अग्रण धुळगावमध्ये जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. जलस्रोतातील गाळ काढणे, बळकटीकरण, बोअर व विहीर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ओढे, नाले पात्रातील गाळ काढण्याची कामे केली जातील. ओढ्याच्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी अग्रणी पाणी फाउंडेशनने पाठपुरावा सुरू ठेवला होता. जलबिरादरीचे जिल्हा समन्वयक अंकुश नारायणकर म्हणाले की, पाणी मुरण्याची क्षमता वाढली की भविष्यात दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही. उन्हाळ्यातही मुबलक पाणी उपलब्ध होईल.
यावेळी अर्जुन भोसले, सागर साळुंखे, बालाजी चव्हाण, शिवदास भोसले, ज्ञानेश्वर भोसले, सुभाष भोसले, प्रतापसिंह भोसले, शिवाजी ढोले, अण्णासाहेब भोसले, कमलाकर देशमुख, राजू सय्यद, शशिकांत कनप उपस्थित होते.