जत रोड स्टेशनवरून एक्स्प्रेस रेल्वे सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:17 AM2021-07-09T04:17:46+5:302021-07-09T04:17:46+5:30
जत रोड हे जत तालुक्यातील एकमेव स्टेशन आहे. जतबरोबरच त्याचा उपयोग आटपाडी तालुक्याला होणार आहे. या ठिकाणाहून व्यापारी, सैन्यदलातील ...
जत रोड हे जत तालुक्यातील एकमेव स्टेशन आहे. जतबरोबरच त्याचा उपयोग आटपाडी तालुक्याला होणार आहे. या ठिकाणाहून व्यापारी, सैन्यदलातील सैनिक यांना मिरज किंवा सोलापूर या ठिकाणी जावे लागते. तसेच आटपाडी व जत तालुक्यातील अनेक गलाई व्यावसायिक देशातील वेगवेगळ्या शहरांत व्यापार करीत आहेत. यामुळे कोल्हापूर-नागपूर, पंढरपूर-बंगळुरू आदी अतिजलद गाड्यांना जत रोड स्टेशन थांबा देण्यात यावा, त्याचबरोबर महालक्ष्मी किंवा कोयना एक्स्प्रेस जत रोड स्टेशनवरून सोडण्यात याव्यात. यामुळे हजारो नोकर, कामगारांची सोय होणार आहे. याचा फायदा आटपाडी व जत तालुक्याला होणार आहे.
पंढरपूर-मिरज पॅसेंजर दररोज सुरू करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असून सांगोला, जत, आटपाडी या तालुक्यातील औद्योगिक कामगार, शेतकरी, व्यापारी यांची सोय होणार आहे. म्हणून दररोज सकाळी ६ ते ७ दरम्यान पंढरपूर-मिरज व संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान मिरज-पंढरपूर रेल्वे सुरू करावी, अशा सूचना जमदाडे यांनी मांडल्या आहेत.
080721\img_20200330_192042.jpg
महालक्ष्मी किंवा कोयना एक्सप्रेस जतरोड स्टेशन वरून सोडण्यात येण्यासाठी प्रयत्न करणार : प्रकाश जमदाडे