कन्या महाविद्यालयात महिला दिनानिमित्त व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:29 AM2021-03-09T04:29:33+5:302021-03-09T04:29:33+5:30

मिरज : जागतिक महिला दिनी मिरजेतील कन्या महाविद्यालयात विविध उपक्रम पार पडले. महाविद्यालयात महिला तक्रार निवारण कक्ष विभागातर्फे ...

Lecture on the occasion of Women's Day at Kanya College | कन्या महाविद्यालयात महिला दिनानिमित्त व्याख्यान

कन्या महाविद्यालयात महिला दिनानिमित्त व्याख्यान

Next

मिरज : जागतिक महिला दिनी मिरजेतील कन्या महाविद्यालयात विविध उपक्रम पार पडले. महाविद्यालयात महिला तक्रार निवारण कक्ष विभागातर्फे ‘महिला विषयक कायदे’ या विषयावर व्याख्यान झाले.

यावेळी जिल्हा न्यायाधीश विश्वास माने यांनी विधी प्राधिकरणाची माहिती दिली. जिल्हा न्यायाधीश मीना पाटील यांनी महिला कामगार कायद्यांबाबत माहिती दिली. वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश मनीषा चव्हाण यांनी शासनाच्या मुलींना सोयीसुविधा व हुंडाविरोधी कायद्याबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे सचिव राजू झाडबुके यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. डॉ. एम. एम. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. एम. एस. शिरगावकर यांनी करून दिला. प्रा. एस. एस. आवटी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी महापालिका व पद्मावती शांतिसेवा फौंडेशनतर्फे ‘स्वच्छ भारत आणि माझी वसुंधरा’ या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. छात्रसेना विभागातर्फे पोस्टर प्रदर्शन व रांगोळी स्पर्धा पार पडल्या. सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर, विजय कोगनोळे, प्राचार्या डॉ. एस. एस. कुलकर्णी, पर्यवेक्षिका डॉ. सुनीता माळी, प्रा. मानसी शिरगावकर, प्रा. नलिनी प्रज्ञासूर्य यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या. डॉ. एम. यु. देशमुख यांनी आभार मानले.

Web Title: Lecture on the occasion of Women's Day at Kanya College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.