सांगलीत आज योगदिनानिमित्त व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:19 AM2021-06-21T04:19:28+5:302021-06-21T04:19:28+5:30
सांगली : येथील चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन केले आहे. ...
सांगली : येथील चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन केले आहे. योगा आणि प्राणायम या विषयावर डॉ. शरद घाटगे मार्गदर्शन करणार आहेत तरी या उपक्रमात सहभागी हाेण्याचे आवाहन महाविद्यालयाच्यावतीने कऱण्यात आले आहे.
---
शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ
सांगली : खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असतानाच, बी-बियाण्यांसह इतर आर्थिक तजवीज करण्यासाठी शेतकऱ्यांकडून बँकातील हेलपाटे वाढले आहेत. शेती कर्जाच्या माध्यमातून यंदाचा खरीप हंगाम साधला जावा यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. ग्रामीण भागात विकास सोसायट्यांच्या माध्यमातून बँकेकडे शेतकऱ्यांकडून कर्जाची मागणी होत आहे.
----
रस्त्यावरील वाहने निघणार कधी?
सांगली : जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारातच लावण्यात येणाऱ्या दुचाकीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण हाेत आहे. गेल्यावर्षी याठिकाणी पूर्णवेळ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती आता पोलीस केवळ बंदोबस्तासाठी असलेतरी वाहने लावणाऱ्यांवर ते कारवाई करत नसल्याने सर्व रस्त्यावर वाहनेच दिसून येत असतात. तरी यावर कारवाईची मागणी होत आहे.
----
पाणी साठल्याने डासांचा फैलाव
सांगली : शहरातील विविध भागात पावसाने पाणी साचून राहिल्याने डासांचा फैलाव होण्याची शक्यता आहे. सखल भागासह मोकळ्या प्लॉटमध्येही पाणी साचून राहीले आहे. या पाण्याचा निचरा होत नसल्याने या पाण्यामुळे शेवाळ व डासांची शक्यताही नाकारता येत नाही.
----
सहा हजारावर रुग्ण हाेम आयसोलेशनमध्ये
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांचीही संख्या घटली आहे. त्यामुळे लक्षणे नसलेली अथवा सौम्य लक्षणे असलेल्या सहा हजार ९६२ जण होम आयसोलेशनमध्येच उपचार घेत आहेत. होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या १३ हजारावर पोहोचली होती त्यात आता झपाट्याने घट होत आहे.