कन्या शाळेत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:28 AM2021-03-10T04:28:17+5:302021-03-10T04:28:17+5:30
मिरज : मिरजेतील ज्युबिली ज्युनिअर कॉलेज व कन्या शाळेत, जागतिक महिला दिनानिमित्त तालुका विधिसेवा समिती, मिरज बार ...
मिरज : मिरजेतील ज्युबिली ज्युनिअर कॉलेज व कन्या शाळेत, जागतिक महिला दिनानिमित्त तालुका विधिसेवा समिती, मिरज बार असोसिएशन व मिरज एज्युकेशन सोसायटीतर्फे निरीक्षण कार्यक्रम व शिबिर पार पडले. दिवाणी न्यायाधीश एस. बी. नाईकनवरे कार्यक्रमाच्या अध्यक्षा होत्या.
न्यायाधीश श्रीमती एस. बी. नाईकनवरे यांनी महिलांविषयी कायदे, मुलींनी आपले संरक्षण व करिअर कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले. सहदिवाणी न्यायाधीश यू. पी. कोळी यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, हुंडा प्रतिबंधक कायदा याबाबत माहिती दिली. ॲड. पुष्पा शिंदे यांनी पीडितेस भरपाई व मनोधैर्य योजनेबाबत मार्गदर्शन केले. ॲड. सोनाली चौगुले यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याची माहिती दिली. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश एन. एम. वाली, मिरज बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. ए. एस. कुडचे, ॲड. बी. आर. बेळंकी, ॲड. सौरभ वाटवे, ॲड. सुनील कुलकर्णी उपस्थित होते. मुख्याध्यापिका विनया पाठक यांनी प्रास्ताविक केले. हर्षदा बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले.