कारंदवाडी सोसायटीसाठी दिग्गज मैदानात

By admin | Published: October 26, 2015 11:49 PM2015-10-26T23:49:57+5:302015-10-27T00:10:37+5:30

निवडणुकीतील चुरस वाढली : दोन नोव्हेंबरला मतदान; मतदानाची जुळवाजुळव सुरु

On the legendary grounds of the Karandwadi Society | कारंदवाडी सोसायटीसाठी दिग्गज मैदानात

कारंदवाडी सोसायटीसाठी दिग्गज मैदानात

Next

सुरेंद्र शिराळकर-आष्टा--कारंदवाडी (ता. वाळवा) येथील कारंदवाडी सर्व सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक राष्ट्रवादीच्याच दोन गटात लागली आहे. माजी जि. प. सदस्य संभाजी कचरे, राजारामबापू पाटील सह. साखर कारखाना शेती कमिटीचे अध्यक्ष श्रीकांत कबाडे विरुध्द सर्वोदय सह. साखर कारखान्याचे माजी संचालक रमेश ऊर्फ आप्पासाहेब हाके, राजारामबापू दूध संघाचे माजी संचालक जालिंदर हाके, प्रगतशील शेतकरी शेतीनिष्ठ सुरेश कबाडे, माजी आमदार विलासराव शिंदे गटाचे डॉ. तुषार कणसे यांच्या गटात लागल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
मागील २० ते २५ वर्षांपासून माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी कचरे, श्रीकांत कबाडे, रमेश हाके या त्रिमूर्तींनी कारंदवाडीचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले. जलस्वराज्य योजनेतून गावाचा पाणी प्रश्न सोडविला. रस्ते, गटारीसह कोट्यवधीच्यायोजना मार्गी लावल्या. परंतु सोसायटी निवडणुकीच्या निमित्ताने या त्रिमूर्तीमधील संघर्ष विकोपाला गेला आहे.
रमेश हाके यांना ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभव तसेच राजारामबापू कारखाना संचालक पदाची, तर सुरेश कबाडे यांना जिल्हा परिषद, पचायत समितीसह राजारामबापू बँकेवर संधी मिळाली नाही. रमेश हाके व पद्मजा कबाडे यांचे तिकीट कापण्यात संभाजी कचरे व श्रीकांत कबाडे यांचाच हात असल्याची चर्चा आहे. यातूनच गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र असलेले दिग्गज वेगळे झाल्याने गावातील राजकारण तापले आहे. रमेश हाके, जालिंदर हाके, सुरेश कबाडे, डॉ. तुषार कणसे गटाने परिवर्तन विकास आघाडीचे १३ उमेदवार दिले आहेत. भाऊसाहेब आवटी, सुरेश कबाडे, बाळासाहेब काळे, सुनील खोत, संभाजी जाधव, लक्ष्मण मस्के, आप्पासाहेब हाके, विकास हाके, सुशिला पाटील, शकुंतला शेडबाळे, दिनकर शिंगे, लक्ष्मण टोमके, शामराव कानिरे हे रिंगणात आहेत.
संभाजी कचरे, श्रीकांत कबाडे यांच्या जय सहकार पॅनेलकडून विद्याधर आवटी, आप्पासाहेब वाडकर, महावीर खोत, बाबासाहेब हाके, सोमाजी कोळेकर, दिलीप कोडूलकर, सुनील इंगवले, पोपट कोळी, सुमन गडदे, सुमन आवटी, बजरंग शिंगे, आनंदा लावटे, सचिन लोंढे हे रिंगणात आहेत. दोन्ही गटांनी आपणच विजयी होणार, असा दावा केला आहे. दि. २ नोव्हेंबर रोजी मतदान व निकाल आहे.

गावाचा व सोसायटीच्या सभासदांचा विकास करण्यासाठी आम्ही परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून लढत असून, सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
- रमेश हाके, माजी संचालक, सर्वोदय साखर कारखाना


माजी ग्रामविकास मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गावाचा विकास केला आहे. सभासद शेतकऱ्यांच्या पाठबळावर आम्ही निश्चित यशस्वी होऊ.
- श्रीकांत कबाडे, अध्यक्ष, राजारामबापू कारखाना, शेती विभाग.

Web Title: On the legendary grounds of the Karandwadi Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.