आटुगडेवाडी येथील शेळीवर बिबट्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 02:21 PM2017-10-03T14:21:58+5:302017-10-03T14:21:58+5:30
आटुगडेवाडी (मेणी) येथील तलावाच्या दऱ्यात बिबट्याने दिनकर आटुगडे यांच्या समोर शेळीवर हल्ला करत डोंगराच्या बाजूने ओढ़त नेले. आठ दिवसातील ही दूसरी घटना असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोकरुड , दि. ३ : आटुगडेवाडी (मेणी) येथील तलावाच्या दऱ्यात बिबट्याने दिनकर आटुगडे यांच्या समोर शेळीवर हल्ला करत डोंगराच्या बाजूने ओढ़त नेले. आठ दिवसातील ही दूसरी घटना असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
आटुगडेवाडी येथील सर्व शेतकरी आपल्या जनावराना तलावाच्या पलीकडील बाजुच्या दऱ्यात चारावयास घेऊन जातात. दिनकर चंद्रु आटुगडे रोजच्या प्रमाणे रविवारी आपली जनावरे व शेळी घेऊन गेले होते.जनावरे व शेळी दिनकर यांच्या समोर चरत असताना दुपारी दोनच्या सुमारास डोंगराकडील बाजूने आलेल्या बिबट्याने शेळीवर हल्ला केला.
दिनकर यांनी दगड आणि काठीचा धाक दाखवुन हुसकावन्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्याने शेळीला ठार करत डोंगराच्या बाजूने ओढ़त नेले. सहा दिवसापूर्वी आटुगडेवाडी येथीलच सर्जेराव आनंदा आटुगडे यांच्या बकऱ्यास बिबट्या असाच हल्ला करत डोंगराच्या बाजूने ओढ़त नेले होते.
एकाच आठवड्यात बिबट्याने दोनवेळा बकरे-शेळी वर हल्ला करून ठार मारल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आसुन वनविभागाने तातडीने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.