कुसाईवाडी परिसरात बिबट्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:54 AM2020-12-11T04:54:39+5:302020-12-11T04:54:39+5:30
कुसाईवाडी येथील शिवराम मुदगे यांच्या गोठ्यातील शेळी व दोन कोकरे बुधवारी मध्यरात्री बिबट्याने फस्त केली. परिसरातील ओढ्याशेजारील गोठ्यातून ही ...
कुसाईवाडी येथील शिवराम मुदगे यांच्या गोठ्यातील शेळी व दोन कोकरे बुधवारी मध्यरात्री बिबट्याने फस्त केली. परिसरातील ओढ्याशेजारील गोठ्यातून ही कोकरे बिबट्याने नेली, तर सकाळी शेळी मृतावस्थेत आढळून आली.
तसेच गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वाण्याच्या दरा येथील मालकी शेतात बाजीराव खोत शेळया चारण्यास गेले असता, अचानक उसाच्या शेतातून बिबट्याने त्यांच्या गाभण शेळीवर हल्ला केला व शेळी ओढत उसाच्या फडात नेली. शेळीवर हल्ला होत असताना खोत याने आरडाओरडा केला, परंतु बिबट्या गुरगुरत त्यांच्याही अंगावर आल्याने घाबरून खोत यांनी पळ काढला. आरडाओरड केल्यानंतर लोक जमा झाले. परंतु भीतीमुळे लोक तेथून निघून गेले. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.