शिराळ्यात सहा वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 11:07 PM2022-02-01T23:07:26+5:302022-02-01T23:08:00+5:30

जखमी बालकावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

leopard attack on a six year old boy in shirala continue treatment at the hospital | शिराळ्यात सहा वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू

शिराळ्यात सहा वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा: तडवळे (ता.शिराळा) येथील गोल पानंद येथे ऊसतोड कामगारांचा मुलगा गणेश श्रीराम कामबीलकर (वय ६ रा.मानकुरवाडी जि. बीड) या बालकांवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. सदर घटना मंगळवार दि.१  रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली. जखमी बालकावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वारंवार होणाऱ्या बिबट्या च्या हल्याने नागरिक , शेतकरी , ऊसतोड कामगार यांच्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्या व गव्यांचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गोल पानंद येथील शिवाजी तुकाराम पाटील यांच्या शेतातील ऊसतोड सुरू होती.सायंकाळी साडेसहा च्या दरम्यान ट्रॅक्टर मध्ये ऊस भरण्याचे काम सुरू होती.यावेळी अंधाराचा फायदा घेऊन ट्रॅक्टर च्या पुढील बाजूस बसलेल्या  गणेश वर हल्ला करून त्याला नरड्याला पकडून बिबट्या पळताना दुर्गा दुरंदरे ऊसतोड कामगार महिलेने पाहिले .तिने आरडाओरडा केल्याने तेथील ऊसतोड कामगार , ट्रॅक्टर चालक आदींनी बिबट्या चा पाठलाग केला असता बिबट्या गणेश ला टाकून पळून गेला. 

यानंतर तातडीने अमृत पाटील , सुभाष पाटील आदी ग्रामस्थांनी जखमी गणेश ला घेऊन उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. त्याचेवर डॉ.अनिरुद्ध काकडे , डॉ गणेश राजमाने यांनी प्राथमिक उपचार करून सांगली येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. यावेळी वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल चंद्रकांत देशमुख, वनपाल हणमंत पाटील वनरक्षक बिऊर, वनरक्षक अक्षय शिंदे, क्षेत्रसहाय्यक बाबासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने बिबट्या ची शोध मोहीम सुरू केली.

अकरा महिन्यांनी  पुन्हा बिबट्या चा हल्ला

याच गावात दि.२२ फेब्रुवारी २०२१ रोजी जाईच्या विहिरी जवळ बंडा पाटील यांच्या शेतात ऊस तोड चालू होती . ऊस तोडण्यासाठी बीड कडील ऊस तोड मजूर आले होते . शमसुद्दीन निजामुद्दीन शेख या ऊस तोड मजुराने बाजूला असणाऱ्या झाडाखाली सावलीत यावेळी सरपंच या बाळाला झोपवले होते . भर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने बाजूलाच असणाऱ्या ओढ्याच्या दिशेने येऊन बाळाच्या दिशेने झेप घेतली . त्याला जबड्यात पकडून धाव घेतली यावेळी आरडाओरडा केल्याने  बिबट्याने बाळाला टाकून पलायन केले . त्या जखमी बाळास उचरासाठी दवाखान्यात नेण्यात आले मात्र रस्त्यातच त्याची प्राणजोत मालवली . या घटनेच्या अगोदर दोन दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्याने दोघाच्यावर हल्ला केला होता.
 

Web Title: leopard attack on a six year old boy in shirala continue treatment at the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.