पेठमध्ये बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:24 AM2021-04-26T04:24:43+5:302021-04-26T04:24:43+5:30
पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील वाटेगाव पाणंद भागात शेतातील वस्तीवर बिबट्याने हल्ला करून कुत्र्याचा फडशा पाडला. ...
पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील वाटेगाव पाणंद भागात शेतातील वस्तीवर बिबट्याने हल्ला करून कुत्र्याचा फडशा पाडला. यामुळे या भागातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पेठ परिसरात चार महिन्यांपूर्वी बिबट्याचे दर्शन झाले हाेते. अनेक ठिकाणी जनावरांच्या गोठ्यावर बिबट्याने हल्ला केला होता. यावेळी वन अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. तसेच याच भागातील ज्यूस फॅक्टरीमागील भागात गुरुवारी रात्री बिबट्याने कृष्णात पवार यांच्या वस्तीवर असणाऱ्या कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार मारले. शुक्रवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली. घटनास्थळी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. यामध्ये दोन ठसे वेगवेगळे दिसून आल्याने दाेन बिबटे असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे या भागातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदाेबस्त करावा अशी मागणी हाेत आहे.