कवठेएकंद, नागाव परिसरात बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:30 AM2021-03-09T04:30:50+5:302021-03-09T04:30:50+5:30
तरस आढळल्याच्या घटनेनंतर आता वनविभागाकडून याठिकाणी पाहणी केली आहे. तासगाव तालुक्यातील नागाव कवठेच्या शिवारात ३ मार्च रोजी रात्री अडीचच्या ...
तरस आढळल्याच्या घटनेनंतर आता वनविभागाकडून याठिकाणी पाहणी केली आहे.
तासगाव तालुक्यातील नागाव कवठेच्या शिवारात ३ मार्च रोजी रात्री अडीचच्या सुमारास कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाने ऊसतोड मजूर अचित आंधळे जागे झाले. कुत्र्याच्या भुंकण्याच्या दिशेने पाहिले असता बिबट्या उसाच्या शेताच्या दिशेने जात होता. यानंतर ऊसतोड मजुरांच्यात भीतीचे वातावरण पसरले. ४ मार्चरोजी रात्री साडेनऊच्यादरम्यान पर्यावरणप्रेमी अविनाश पाटील यांना व काही शेतकऱ्यांनाही याचे दर्शन झाले.
ग्रामपंचायतीकडून स्पीकरद्वारे रात्री शेतात जाऊ नका, काळजी घ्या, आशा सूचना ग्रामस्थांना केल्या आहेत. घटनास्थळी बिबट्याच्या पावलांचे ठसे स्पष्ट दिसतात. त्याचे फोटो ऊसतोड मजुरांनी घेतले आहेत. मात्र बिबट्या दिसलेल्या ठिकाणी वनविभागाचे अधिकारी कर्मचारी जाऊन आले. मात्र शेतातील पावलांचे ठसे नेमके कशाचे आहेत, हे त्यांना समजू शकले नाही.