पुनवतमध्ये भरदिवसा बिबट्याचा वावर, शेतकरी भयभीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 03:52 PM2022-03-12T15:52:48+5:302022-03-12T15:53:11+5:30

पुनवत : पुनवत (ता. शिराळा) येथील तांबुळ नावाच्या शिवारात आज, शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास मक्याच्या शेतात काही शेतकऱ्यांना बिबट्या दिसला. एका भटक्या कुत्र्याची ...

Leopards roam all day in Punvat sangli, farmers scared | पुनवतमध्ये भरदिवसा बिबट्याचा वावर, शेतकरी भयभीत

पुनवतमध्ये भरदिवसा बिबट्याचा वावर, शेतकरी भयभीत

Next

पुनवत : पुनवत (ता. शिराळा) येथील तांबुळ नावाच्या शिवारात आज, शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास मक्याच्या शेतात काही शेतकऱ्यांना बिबट्या दिसला. एका भटक्या कुत्र्याची शिकार करुन तो खात बसला होता. बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी भयभीत झाले असून वन विभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पुनवत गावच्या दक्षिण बाजूला तांबुळ नावाचा शिवार आहे. सध्या या भागात ऊसासह मक्याची पिके आहेत. या भागातील एका मक्याच्या पिकात सकाळी दहाच्या सुमारास रघुनाथ शेळके, दत्तात्रय जाधव, नामदेव जाधव, वसंत शेळके, मारुती शेळके, बाळासाहेप यादव आदी शेतकऱ्यांना बिबट्या दिसला. हा बिबट्या एका कुत्र्याचा फडशा पाडत होता.

भरदिवसाही बिबट्या नजरेस पडू लागल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. फुपेरे, शिराळे खुर्द परिसरातही बिबट्याचे दर्शन सातत्याने होत आहे.

Web Title: Leopards roam all day in Punvat sangli, farmers scared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.