नेर्ले परिसरात बिबट्याचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:27 AM2021-01-23T04:27:51+5:302021-01-23T04:27:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नेर्ले : नेर्ले परिसरातील महामार्गाच्या पश्चिमेला व फकिरागडाच्या उत्तरेला असणाऱ्या कदम वस्तीच्या ‘घोल’ परिसरात बिबट्याचा वावर ...

Leopards roam the Nerle area | नेर्ले परिसरात बिबट्याचा वावर

नेर्ले परिसरात बिबट्याचा वावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नेर्ले : नेर्ले परिसरातील महामार्गाच्या पश्चिमेला व फकिरागडाच्या उत्तरेला असणाऱ्या कदम वस्तीच्या ‘घोल’ परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकरी व दूध उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्यासदृश प्राण्याने चार कुत्र्यांचा फडशा पाडला असून, परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. याची नोंद घेत वनरक्षक अधिकारी दीपाली सागावकर, वनपाल अमोल शिंदे, अमोल साठे, वनरक्षक रायणा पाटोळे यांच्यासह वनखात्याचे अधिकारी यांनी घोल परिसरात चाचपणी केली.

नेर्ले व परिसरात आठवड्यापासून महामार्गाच्या पश्चिमेला कदमवस्तीजवळ घोल या ठिकाणी शेतकऱ्यांची शेती व दुभत्या जनावरांची वस्ती आहे. काही दिवसांपूर्वी येथील शेतकरी सतीश कदम यांच्या बाहेर बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला चढवला व बांधलेल्या कुत्र्याला ठार केले. त्याच्या अगोदर चार दिवसांपूर्वी तीन कुत्र्यांचा फडशा बिबट्याने पाडला आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, परिसरात ऊस शेती आहे. उसाच्या शेतात बिबट्या व त्याची पिले राहत असल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकरी सांगत आहेत. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी व वस्तीवर राहणाऱ्या, काम करणाऱ्या महिलांनी केली आहे. या परिसरात जाताना चारी बाजूंनी ऊसशेती आहे. त्यामुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत.

यावेळी माजी सरपंच जयकर कदम, सतीश कदम, प्रदीप कदम, अभिजित कदम, दिलीप कदम,पोपट कदम, प्रशांत कदम, विश्वास कदम, संभाजी कदम, अनिल कदम, शिवाजी कदम हे शेतकरी उपस्थित होते.

चौकट

बिबट्यापासून बचावसाठी हे करा.

शेतकऱ्यांनी घाबरू नये,

मोबाईल अथवा रेडिओवरती गाणी लावावी,

बॅटरीचा वापर करावा,

जनावरे बंदिस्त करावीत.

फोटो -२२०२२०२१-आयएसएलएम-नेर्ले न्यूज

नेर्ले येथील घोल परिसरात बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Web Title: Leopards roam the Nerle area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.