विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे - शशिकांत बोराटे : सांगलीत रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 07:16 PM2018-05-05T19:16:55+5:302018-05-05T19:16:55+5:30

सांगली : विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच वाहतूक नियमांची माहिती व्हावी, यासाठी पुढील महिन्यापासून पोलीस दलातर्फे त्यांना वाहतुकीचे धडे दिले जातील, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी दिली.

Lessons for Transportation of Students - Shashikant Borate: Samalyat Road Security Campaign concludes | विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे - शशिकांत बोराटे : सांगलीत रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप

विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे - शशिकांत बोराटे : सांगलीत रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप

googlenewsNext

सांगली : विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच वाहतूक नियमांची माहिती व्हावी, यासाठी पुढील महिन्यापासून पोलीस दलातर्फे त्यांना वाहतुकीचे धडे दिले जातील, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी दिली.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या २९ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप शनिवारी झाला. त्यावेळी बोराटे बोलत होते. पोलीस मुख्यालयातील कृष्णा मॅरेज हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास निवासी उप जिल्हाधिकारी अमृत नाटेकर, जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संजय साळुंखे, राज्य परिवहन महामंडळाच्या सांगलीच्या आगाराच्या विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर, पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, आरटीओ निरीक्षक रमेश सातपूतेश वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल निकम, उपनिरीक्षक बाळासाहेब माळी उपस्थित होते.
बोराटे म्हणाले, प्रत्येक वाहनधारकाने रस्त्यावर वाहतूक नियमांचे पालक केले पाहिजे. देशात दररोज चारशे लोकांचा अपघातात बळी जात आहे. शाळकरी मुले ही देशाची भावी पिढी आहे. मुले आतापासूनच वाहन चालविताना दिसतात. पण त्यांना वाहतूक नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. मुलांनाही त्यांच्या पालकांना वाहतूक नियम पाळण्याबाबत मार्गदर्शन केले पाहिजे. पालक दुचाकीवरुन जात असतील तर त्यांना हेल्मेट घालण्यास सांगितले पाहिजे. पोलीस मुख्यालयात अत्याधुनियक ‘ट्राफीक पार्क’ उभारण्याचे काम सुरु झाले आहे. या पार्कमध्ये पुढील महिन्यापासून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे दिले जातील. यासाठी आरएसपीची मदत घेतली जाईल. वाहतूक नियमांचे शिक्षक हा महत्वाची बाब बनली आहे. हे नियम विद्यार्थ्यांनी आतापासूनच अंगीकारले पाहिजेत.
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संजय साळुंखे म्हणाले, वाहनधारकांनी स्वत:सह दुसऱ्याची सुरक्षितता धोक्यात आणू नये. वाहन चालविताना वेगानवर नियंत्रण ठेवले पाहिजे. वाहतूक नियम तोडला आणि पोलिसांनी पकडले तर आपली चूक मोठ्या मनाने कबूल करुन शासकीय दंड आनंदाने भरावा. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ऊन, वारा व पाऊस झेलून काम करणाºया वाहतूक यंत्रणेला कोणीही आव्हान देण्याचा प्रयत्न करु नये. लायसन्स काढताना ‘शॉर्टकट’चा मार्ग अवलंबू नये. अपघातग्रस्तांना मदत करावी.
सहाय्यक निरीक्षक अतुल निकम यांनी स्वागत व प्रास्तविक केले. उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांनी सुत्रसंचलन केले. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब पाटील, जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे बाळासाहेब कलशेट्टी रिक्षा संघटनेचे नेते फिरोज मुल्ला, महेश चौगुले यांच्यासह शाळकरी मुले, आरएसपीचे अधिकारी उपस्थित होते.
चौकट...
विद्यार्थ्यांशी संवाद
अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तराद्वारे संवाद साधला. वाहतूक नियमांविषयी प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनी काही प्रश्नांची उत्तरे बरोबर, तर काही चुकीची दिली. चुकीच्या उत्तराबाबत बोराटे यांनी मार्गदर्शन केले. रस्त्यावरुन चालताना कोणत्या बाजूने चालावे, वाहन कोणत्या बाजून चालवाने, यासह अनेक प्रश्ने विचारली.

 

Web Title: Lessons for Transportation of Students - Shashikant Borate: Samalyat Road Security Campaign concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.