जतमधून कदम काँग्रेस हद्दपार करू

By admin | Published: April 5, 2017 11:29 PM2017-04-05T23:29:27+5:302017-04-05T23:29:27+5:30

सुरेश शिंदे : वाळेखिंडीत वसंतदादा विकास आघाडीच्या सदस्यांचा सत्कार

Let's move out of Congress to expel Congress | जतमधून कदम काँग्रेस हद्दपार करू

जतमधून कदम काँग्रेस हद्दपार करू

Next



शेगाव : वसंतदादांच्या सांगली जिल्ह्यात कदम बंधूंनी कॉँग्रेसची वाट लावली. पतंगराव कदम पालकमंत्री असताना जत तालुक्याचे विभाजन केले नाही. केवळ पै-पाहुणे, नात्या-गोत्याचे राजकारण करून फक्त कदम कॉँग्रेस वाढवली. कॉँग्रेसला कायमचे हद्दपार करण्यासाठी आगामी जत नगरपरिषदेत भाजपबरोबर युती करून सत्ता आणू, असा इशारा वसंतदादा विकास आघाडीचे नेते सुरेश शिंदे यांनी दिला.
वाळेखिंडी (ता. जत) येथे भाजप, वसंतदादा विकास आघाडीच्या नूतन सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात शिंदे बोलत होते. सभापती मंगल जमदाडे, उपसभापती शिवाजी शिंदे, नूतन सरपंच भाऊसाहेब शिंदे व इतर पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
शिंदे म्हणाले, जत तालुक्यात भाजपने वसंतदादा विकास आघाडी, जनसुराज्यबरोबर युती केली असती, तर तालुक्यातून कदम कॉँग्रेस हद्दपार झाली असती. जत पंचायत समितीमध्ये पाठिंबा देण्यासाठी आमच्यावर मुंबईवरून दबाव आला. परंतु आम्ही भाजपलाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आ. विलासराव जगताप यांनी आम्हाला उपसभापतीपद दिले. अगदी शेवटच्याक्षणी लाचार कॉँग्रेसने जगताप यांच्याकडे मुलगा मनोज जगतापला उपसभापती करण्यासाठी विनाअट पाठिंबा देण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु जगताप यांनी, आता विषय संपला असून, निर्णय झाल्याचे सांगितले.
माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत म्हणाले, जतमध्ये कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या नूतन सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात बेफाम दगडफेक करून गुंडगिरीचे दर्शन घडविले. जत शहरातील रस्त्यांच्या कामात गुंडगिरी सुरू आहे. कामे अडविली जात आहेत. प्रत्येक कामात अडथळा आणण्याचा उद्योग कॉँग्रेसकडून सुरू आहे. जत शहरात गुंडगिरीला कोण साथ देत आहे, हे जनतेने ओळखले आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, अ‍ॅड. प्रभाकर जाधव, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव ताड, माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी मनोज जगताप, जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता जाधव, सदस्या मंगल नामद, लक्ष्मी माळी, सुशिला तावशी, रामगौडा जिवण्णावर, प्रमोद सावंत उपस्थित होते. विलास शिंदे यांनी स्वागत केले. यू. डी. शिंदे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
सुरेश शिंदे यांनी भाजपच्या गाडीत बसावे
डॉ. रवींद्र आरळी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा केली होती. जत तालुकाही कॉँग्रेसमुक्त करण्यासाठी सुरेश शिंदे यांनी आता कोणाचीही वाट न पाहता भाजपच्या गाडीत बसावे. यासाठी सर्व ते सहकार्य करण्यात येईल.

Web Title: Let's move out of Congress to expel Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.