जनतेच्या सहभागातून कोरोना संकटावर मात करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:29 AM2021-04-28T04:29:29+5:302021-04-28T04:29:29+5:30
नगरसेवक भोसले म्हणाले, सध्याच्या काळात बेडची असणारी स्थिती व प्रभाग क्रमांक १८ मध्ये कोरोना रुग्णांना विलगीकरणासाठी येत असलेल्या अडचणींमुळे ...
नगरसेवक भोसले म्हणाले, सध्याच्या काळात बेडची असणारी स्थिती व प्रभाग क्रमांक १८ मध्ये कोरोना रुग्णांना विलगीकरणासाठी येत असलेल्या अडचणींमुळे लोकसहभागातून कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी सर्व मित्रपरिवाराने मदत दिली. स्व.पतंगराव कदम व ना. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली रुग्णांना सेवा देता येते यातच समाधान आहे. संकटाच्या काळात आम्ही नागरिकांसोबत असल्याचे भोसले यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवा नेते विशाल पाटील, जितेश कदम, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, आयुक्त नितीन कापडणीस यांनीही शुभेच्छा दिल्या. यावेळी धनंजय वाघ, शहाजी भोसले, जयंत जाधव, मुस्तफा मुजावर, गोपीनाथ जाधव, चंद्रकांत पडसलगी, सुनील रेड्डी, अविनाश साळुंखे, जमीर मुजावर, सोनू शिंदे, स्वप्निल कुंभार, अभिजीत शिंदे, धनंजय झांबरे, सोमनाथ भोसले, मयूर खटावकर, बिरजू पांढरे, अभिजित कोळी, आनंदराव सावंत, गणेश तेली, महेश सोनार उपस्थित होते.