नेर्ले येथे कोल्ह्यास जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:54 AM2020-12-11T04:54:44+5:302020-12-11T04:54:44+5:30
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथील राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक कोल्हा जखमी झाला. येथील नेर्ले आधार ॲनिमल ...
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथील राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक कोल्हा जखमी झाला. येथील नेर्ले आधार ॲनिमल रिस्पेक्ट टीमच्या कार्यकर्त्यांनी वनविभाग व प्राणी मित्र गणेश निकम व मीनाक्षी निकम यांना बोलावून जखमी कोल्ह्यास पुढील उपचारासाठी वनविभागाच्या वनरक्षक दीपाली सागावकर यांच्या ताब्यात दिले.
गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास एल. पी. पाटील मळ्याच्या पूर्वेला एक मादी कोल्ह्यास महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात कोल्ह्याच्या पाठीला धडक बसली व रक्त येऊन तो जखमी झाला. तेथून फरफटत तो गावच्या दिशेला असलेल्या पूर्वेच्या बाजूला उसाच्या शेतात येऊन थांबला. अक्षय पाटील, मनोज पाटील, सागर सोनवणे, शंतनू वंजारी, जय माने, साद इबुशे, संतोष पाटील, सचिन पाटील, प्रा. विजय लोहार, वनरक्षक दीपाली सागावकर यांनी माहिती मिळाल्यावर ते मदतीसाठी पुढे आले. जखमी कोल्ह्यास उपचारासाठी शिराळा येथे नेले.
फोटो - १०१२२०२०-आयएसएलएम-नेर्ले न्यूज