सांगलीत जखमी घुबडाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:34 AM2020-12-30T04:34:50+5:302020-12-30T04:34:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कावळे व घारी यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या घुबडाला इन्साफ फाऊंडेशनच्या माध्यमातून जीवदान देण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कावळे व घारी यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या घुबडाला इन्साफ फाऊंडेशनच्या माध्यमातून जीवदान देण्यात आले.
सांगलीच्या आमराईमध्ये कावळे व घारींनी हल्ला करून बदामी घुबडास जखमी केले. आमराईमधून जे.सी.बी चालक प्रभाकर व फिरायला आलेल्या लोकांना हा जखमी घुबड आढळून आला. त्यांनी इन्साफ फाऊंडेशनच्या हेल्पलाईनला संपर्क करून याबाबतची माहिती दिली. घुबड त्यांच्या ताब्यात देण्यात आले. फाऊंडेशनचे मुस्तफा मुजावर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह उपचार सुरू केले. उपचाराला यश मिळून काही दिवसांत हे घुबड व्यवस्थित झाले. त्यानंतर फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यास सोडून दिले. याकामी मंदार शिंपी, विकास सोलनकर, रहीमत मुजावर, निखिल शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याची माहिती मुस्तफा मुजावर यांनी दिली.
फाऊंडेशनच्या माध्यमातून आजवर अनेक प्राण्यांना जीवदान देण्यात आले. नागरिकांनी त्यांना असे प्राणी, पक्षी जखमी अवस्थेत किंवा अडचणीत सापडल्याचे आढळल्यास संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन मुजावर यांनी केले.