सेंद्रीय शेतीशिवाय जीवन धोकादायक: रामदेवबाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:11 PM2018-04-15T23:11:15+5:302018-04-15T23:11:15+5:30

Life without risk of organic farming: Ramdev Baba | सेंद्रीय शेतीशिवाय जीवन धोकादायक: रामदेवबाबा

सेंद्रीय शेतीशिवाय जीवन धोकादायक: रामदेवबाबा

googlenewsNext


शिरटे : येत्या पन्नास वर्षात सेंद्रीय शेतीला महत्त्व दिले नाही, तर मानवी जीवन उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन योगगुरू रामदेवबाबा यांनी केले. कृष्णा कारखान्याची केमिकलविरहित साखर उच्च दर्जाची असून ती मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याचे संकेतही त्यांनी दिले.
रेठरेबुद्रुक (ता. कºहाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर ‘किसान समृध्दी मेळावा व विषमुक्त शेती’ या विषयावरील व्याख्यानात रामदेवबाबा बोलत होते. यानंतर योग साधना महोत्सवही घेण्यात आला. यावेळी कृष्णा कारखान्यात उत्पादित झालेल्या १४ लाख ५१ हजार १ व्या साखर पोत्याचे पूजन व प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव रामदेवबाबा यांच्याहस्ते करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले अध्यक्षस्थानी होते.
व्यासपीठावर श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, पतंजली योगपीठाचे केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य, विनायक भोसले, कारखान्याचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, संचालक दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, संजय पाटील, सुजित मोरे, गिरीश पाटील, ब्रिजराज मोहिते, अमोल गुरव, पांडुरंग होनमाने, दिलीप पाटील, माणिकराव पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
रामदेवबाबा म्हणाले, आपल्या देशात ६० कोटीपेक्षा अधिक लोक शेतकरी व शेतीवर अवलंबून असणारे आहेत. पण त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. याला प्रामुख्याने रासायनिक शेती पद्धती जबाबदार आहे. यापुढील काळात शेतीला सुपीक ठेवण्यासाठी सेंद्रीय शेतीकडे वळणे आवश्यक आहे. या भागात जो शेतकरी सेंद्रीय पद्धतीने साखर अथवा गूळ निर्मिती करेल, त्या शेतकºयांकडून संबंधित उत्पादने आम्ही खरेदी करू. यापुढील काळात आरोग्यदायी जीवनशैलीसाठी सेंद्रीय शेतीशिवाय पर्याय नाही.
आजकाल शेतकºयाच्या खिशात जरा पैसे आले की तो तीर्थक्षेत्र, पर्यटनाला प्राधान्य देतो. यापेक्षा सेंद्रीय शेतीचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करावेत. नवे तंत्रज्ञान आत्मसात करून जैविक शेती पद्धतीचा अवलंब करावा. पशुधन सांभाळायला हवे. कमी वयात व जन्मजात अनेक आजार जडत आहेत. यासाठी आहारविहार चांगला हवा. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी बापू पाडळकर, सुधाताई अळ्ळीमोरे, नितीन तावडे, श्रीराम लाखे, बाळासाहेब लाड, मनोज पाटील, प्रदीप थोरात, जालिंदर पाटील, संग्राम पाटील, आनंदराव मोहिते आदी मान्यवरांसह कºहाड व वाळवा तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Life without risk of organic farming: Ramdev Baba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.