कोरोना नियंत्रणात शिक्षण विभागाची जिवाची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:27 AM2021-05-26T04:27:27+5:302021-05-26T04:27:27+5:30
सांगली : कोरोना नियंत्रणात जिल्ह्याचा शिक्षण विभाग पहिल्या लाटेपासूनच आघाडीवर आहे. त्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी ...
सांगली : कोरोना नियंत्रणात जिल्ह्याचा शिक्षण विभाग पहिल्या लाटेपासूनच आघाडीवर आहे. त्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
त्यांनी पत्रात म्हटले आहे की, कोरोनायुद्धात शिक्षण विभागाचे सर्व घटक चांगले योगदान देत आहेत. शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक जीव धोक्यात घालून काम करत आहेत. प्राथमिक, माध्यमिक विभागातील शिक्षक फ्रंटलाइनवर आहेत. कोरोना चाचण्या, तपासण्या, सर्वेक्षण, तपासणी नाके, लसीकरण, कोविड सेंटर्सचे व्यवस्थापन, होम आयसोलेशन रुग्णांवर लक्ष ठेवणे, रुग्णांचे समुपदेशन आदी कामे करत आहेत. या सर्वांच्या सहकार्यामुळे कोरोनाची प्रतिकूल परिस्थिती हाताळणे शक्य होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागातील सर्व घटकांचे काम गौरवास्पद आहे.