राजेंच्या हातात कमळ... तोंडात शिट्टी !

By Admin | Published: February 13, 2017 10:50 PM2017-02-13T22:50:27+5:302017-02-13T22:50:27+5:30

एकाचवेळी काँगे्रस-भाजपशी अकल्पित युती : स्वकीयाच्या बंडखोरीमुळे शेंद्रेत सुनील काटकरांची तलवार म्यान

Lily in the hands of kings ... shake the mouth! | राजेंच्या हातात कमळ... तोंडात शिट्टी !

राजेंच्या हातात कमळ... तोंडात शिट्टी !

googlenewsNext


सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा तालुक्यात राजकारणाचे अजब रसायन तयार केले आहे. काँगे्रसशी जाहीर युती करत सर्वच ठिकाणी आपल्याला मानणारे उमेदवार उभे केले. त्यांनी भाजपशी केलेली युतीही उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी समोर आली. काँगे्रस व भाजप या दोन टोकांच्या पक्षांना सोबत घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी तयारी केलेले ‘राजकीय रसायन’ अनेकांना विस्मित करणारे ठरले असून, आगामी काळात राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना या माध्यमातून खासदार गट कसा शह देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय व जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सुनील काटकर यांना सातारा विकास आघाडीचे बंडखोर माजी उपसभापती सूर्यकांत पडवळ यांच्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला. शेंद्रे गटात ‘साविआ’ने जकातवाडीतील अपक्ष उमेदवार विठ्ठल ऊर्फ योगेश शिंदे यांना उमेदवारी दिली. आता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या राष्ट्रवादीचे प्रा. शिवाजीराव चव्हाण यांच्याशी त्यांची लढत होणार आहे. शेंद्रे गटात भाजपचे बाजीराव साळुंखे यांच्यासह उत्तम आवाडे (अपक्ष), राहुल जाधव (अपक्ष), सूर्यकांत पडवळ (अपक्ष), मनोहर शिंदे (बसपा) असे एकूण आठ उमेदवार रिंगणात आहेत.
पाटखळ गटात वनिता गोरे (राष्ट्रवादी), हेमलता चवरे (साविआ), सीमा सोनटक्के (भाजप), लिंब गटात प्रतीक कदम (राष्ट्रवादी), बाळासाहेब गोसावी (साविआ), हणमंत चवरे (शिवसेना), रवींद्र वर्णेकर (भाजप) यांच्यात लढत होणार आहे. शाहूपुरी गटात ज्योती गाडे (राष्ट्रवादी), शीतल घोडके (शिवसेना), अनिता चोरगे (साविआ), भारती शिंदे (भाजप) यांच्यात लढत होईल.
गोडोली गटात लक्ष्मी ओव्हाळ (साविआ), मधू कांबळे (राष्ट्रवादी), सीमा गायकवाड, अनिता भोसले (अपक्ष) यांच्या लढत होणार आहे. या गटात भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेऊन सातारा विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. वनवासवाडी गटात कल्पना कांबळे (भारिप), विजया कांबळे (राष्ट्रवादी), रेश्मा शिंदे (साविआ व भाजप) यांची लढत होणार आहे. या गटात भाजपने सातारा विकास आघाडीच्या उमेदवाराला संधी दिली आहे.
कोडोली गटात संगीता कणसे (राष्ट्रवादी), द्राक्षाबाई खडकर (भारिप), अर्चना देशमुख (साविआ), कांचन साळुंखे (अपक्ष), कांताबाई साळुंखे (भाजप) यांच्यात लढत होईल. या गटात राष्ट्रवादीच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक कांचन साळुंखे यांनी बंडखोरी केली आहे.
कारी गटात कमल जाधव (राष्ट्रवादी), श्वेता पवार (भाजप), राजश्री शिंदे (साविआ) अशी तिहेरी लढत होईल. नागठाणे गटात भाग्यश्री मोहिते (साविआ) विरुद्ध विमल मोहिते (राष्ट्रवादी) अशी सरळ लढत होईल. येथे भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिला नाही. वर्णे गटात धनंजय कदम (राष्ट्रवादी), प्रताप गायकवाड (बंडखोर सेना), दिनेश घाडगे (शिवसेना), मनोज घोरपडे (भाजप), गणेश देशमुख (साविआ), राजेंद्र शेळके (स्वाभिमानी शेतकरी संघटना) यांच्यात लढत होईल.
शिवथर गणात उमेश आवळे (अपक्ष), सुनील आवळे (अपक्ष), दयानंद उघडे (राष्ट्रवादी), संतोष उघडे (भारिप), मोहन कांबळे (भाजप), तानाजी शिंदे (साविआ), पाटखळ गणात नीलेश नलावडे (भाजप), हैबतराव नलावडे (शिवसेना), राहुल शिंदे (राष्ट्रवादी), विजय शिंदे (अपक्ष), विलास शिंदे (अपक्ष) यांच्यात लढत होणार आहे.
लिंब गणात रमेश देशमुख (स्वाभिमानी शेतकरी संघटना), आतिष ननावरे (शिवसेना), महेश पाटील (साविआ), विशाल भोसले (भारिप), जितेंद्र सावंत (राष्ट्रवादी), शिवाजी सावंत (भाजप), किडगाव गणात मंगल इंगवले (अपक्ष), सरिता इंदलकर (राष्ट्रवादी), पार्वती कडव (साविआ), मोहिनी चोरगे (भाजप), अर्चना सावंत (शिवसेना) यांच्यात लढत होईल.
शाहूपुरी गणात दिलीप कडव (अपक्ष), रामदास धुमाळ (भाजप), संजय पाटील (साविआ), भारत भोसले (राष्ट्रवादी), खेड गणात मिलिंद कदम (राष्ट्रवादी), गणेश पारखे (भाजप), गोडोली गणात आशुतोष चव्हाण (राष्ट्रवादी), प्रवीण जाधव (भाजप), सचिन तिरोडकर (अपक्ष), अनिल निकम (साविआ) यांच्यात लढत होईल. वनवासवाडी गणात नलिनी जाधव (राष्ट्रवादी), रजनीदेवी जाधव (अपक्ष), रंजना जाधव (भाजप), गोडोली गणात शशिकांत जाधव (राष्ट्रवादी), संजय जाधव (शिवसेना), रामदास ढाणे (भाजप), अनिल निकम (साविआ), रामदास साळुंखे यांच्यात लढत होईल.
संभाजीनगर गणात सुवर्णा राजे (भाजप), लता जाधव (राष्ट्रवादी), रेखा शिंदे (साविआ), दरे खुर्द हणमंत गुरव (साविआ), तानाजी जाधव (भाजप), राहुल दळवी (राष्ट्रवादी), शेंद्रे गणात छाया कुंभार (राष्ट्रवादी), पाकिजा मुलाणी (अपक्ष), मनीषा क्षीरसागर (साविआ), अंबवडे गणात विद्या देवरे (राष्ट्रवादी), स्वाती माने (भाजप), अर्चना मुसळे (शिवसेना), कोमल भंडारे (साविआ), कारी गणात तानाजी खामकर (साविआ), अरविंद जाधव (राष्ट्रवादी), आकाश जाधव (शिवसेना), सचिन मोहिते (भाजप), नागठाणे गणात विजया गुरव (भाजप), प्रमिला सुतार (राष्ट्रवादी), अतीत गणात बेबीताई जाधव (राष्ट्रवादी), सुनीता यादव (साविआ), वर्णे गणात कांचन काळंगे (राष्ट्रवादी), मनीषा जाधव (शिवसेना), कविता साळुंखे (भाजप), विद्या साळुंखे (साविआ), अपशिंगे गणात संजय कदम (साविआ), संजय घोरपडे (भाजप), ज्ञानदेव निकम (राष्ट्रवादी) यांच्यात लढत होणार आहे. (प्रतिनिधी)
‘लोकमत’चा अंदाज तंतोतंत खरा
‘लोकमत’ने यापूर्वी पक्षाची उमेदवारी जाहीर केलेल्या उमेदवारांनाही ऐनवेळी तिकीट कापले जाण्याची भीती असल्याने ते ‘गॅस’वर आहेत, असे मांडले होते. यानुसारच पक्षाची अधिकृत उमेदवारी घेतलेल्या ११ जणांना माघार घ्यावी लागली आहे. सातारा तालुक्याच्या राजकारणात नेहमीच उलथापालथी घडत असतात. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी टिकेल, याची खात्री कोणीच देऊ शकत नाही, ११ अधिकृत उमेदवारांच्या माघारीमुळे ‘लोकमत’चा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे.

Web Title: Lily in the hands of kings ... shake the mouth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.