लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:48 AM2021-03-04T04:48:41+5:302021-03-04T04:48:41+5:30
विटा : २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत लिंगायत धर्माची स्वतंत्र जनगणना करून लिंगायत धर्मास शासन मान्यता मिळण्यासाठी सरकारने चालू अर्थसंकल्पीय ...
विटा : २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत लिंगायत धर्माची स्वतंत्र जनगणना करून लिंगायत धर्मास शासन मान्यता मिळण्यासाठी सरकारने चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रस्ताव करावा व शिफारस करून केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी मागणी लिंगायत धर्म बचाव समितीच्या शिष्टमंडळाने केली. याबाबतचे निवेदन सोमवारी विटा येथे तहसीलदारांना देण्यात आले.
सोमवारी लिंगायत धर्म बचाव समितीचे अध्यक्ष भक्तराज ठिगळे यांच्यासह शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात लिंगायत धर्मास अल्पसंख्याक दर्जा मिळावा, महाराष्ट्र शासनाने चालू अधिवेशनात महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने महामंडळाच्या स्थापनेची घोषणा करावी, यासह विविध मागण्या करण्यात आल्या. लिंगायत समाजाच्या या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्या तातडीने सोडविण्यासाठी चालू अधिवेशनात प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी केली.
यावेळी भागवत सुतार, मुकुंद लकडे, संदेश नष्टे, अॅड. नीशा मार्ले, हणमंत सुतार यांच्यासह लिंगायत समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी तहसीलदारांनी आपल्या मागण्या शासनाला कळविण्यात येतील, अशी ग्वाही दिली.