सुभाषनगरला दारू विक्रेत्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:27 AM2021-05-06T04:27:28+5:302021-05-06T04:27:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सुभाषनगर (ता.मिरज) येथे कडब्याच्या गंजीत देशी दारू लपवून ठेवून विक्री करत असलेल्या एकास अटक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सुभाषनगर (ता.मिरज) येथे कडब्याच्या गंजीत देशी दारू लपवून ठेवून विक्री करत असलेल्या एकास अटक करण्यात आली.
योगेश चंद्रकांत लवाटे (वय ३०, रा बरगाले मळा सुभाषनगर, मिरज ) या संशयिताचे नाव असून त्याच्याकडून ५० हजार रुपयाची दारू जप्त करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक मिरज परिसरात गस्तीवर असताना, सुभाषनगर येथे एकजण कडब्याच्या गंजीत दारूचे बॉक्स लपवून ठेवून दारूची विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार
लवाटे याच्या घरासमोर असलेल्या कडब्याचे गंजीवर छापा टाकत तपासणी केल्यानंतर त्यात दारूचे बॉक्स मिळून आले. त्यात देशी दारूचे ३० हजार रुपये किमतीचे ६ बॉक्स आणि विदेशी कंपनीचे २० हजार रुपये किमतीचे ४ बॉक्स असा एकूण ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. जादा दराने विक्री करणेसाठी हा दारूसाठा केल्याचे लवाटे याने सांगितले.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, सुधीर गोरे, शशिकात जाधव, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.