शहरात झळकली कोविड रुग्णालयांची यादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:26 AM2021-04-24T04:26:43+5:302021-04-24T04:26:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिका क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कोविड हॉस्पिटलची माहिती रुग्णांसह नातेवाइकांना व्हावी, यासाठी आयुक्त नितीन कापडणीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कोविड हॉस्पिटलची माहिती रुग्णांसह नातेवाइकांना व्हावी, यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार शहराच्या प्रवेशाच्या ठिकाणी कोविड हॉस्पिटलची यादी डिजिटल फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना रुग्णालयांची शोधाशोध करताना होणारी कसरत थोडीफार कमी होणार आहे.
महापालिका क्षेत्रात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोविड हॉस्पिटलची शोधाशोध करावी लागते. त्यामुळे महापालिका क्षेत्रात सुरू असणाऱ्या कोविड हॉस्पिटलची माहिती दर्शवणारे फलक शहराच्या प्रवेशाच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. या फलकावर महापालिका क्षेत्रातील कोविड सेंटरची संपूर्ण माहिती, पत्ता तसेच संपर्क क्रमांक नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना कोविड हॉस्पिटलची माहिती पाहिजे आहे. त्यांना कुठेही न फिरता शहराच्या प्रवेशाच्या ठिकाणी सर्व माहिती मिळणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी हे फलक उभारण्याचा निर्णय घेतला होता.