जिल्ह्यातील लॉकडाऊन एक जूनपर्यंत वाढवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:27 AM2021-05-26T04:27:33+5:302021-05-26T04:27:33+5:30
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या सरासरी तेराशेवर स्थिर असली तरी पॉझिटिव्हिटी रेट अद्यापही जादा आहे. त्यात ग्रामीण भागातील रुग्णवाढीच्या राज्यात सर्वाधिक ...
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या सरासरी तेराशेवर स्थिर असली तरी पॉझिटिव्हिटी रेट अद्यापही जादा आहे. त्यात ग्रामीण भागातील रुग्णवाढीच्या राज्यात सर्वाधिक वेग सांगली जिल्ह्यात आहे. त्यामुळे ‘रेड झोन’मध्ये असलेल्या जिल्ह्यातील लॉकडाऊनही पुन्हा वाढविण्यात आला आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनला आतापर्यंत चारवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले की, लॉकडाऊनची मुदत बुधवारी संपणार होती मात्र, आता त्यास पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत सध्या सुरू असलेले निर्बंध कायम असणार आहेत. त्यात संपूर्ण जिल्हाभर संचारबंदी आदेश लागू असणार असून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
याशिवाय सकाळी ७ ते ९ दूध विक्री करता येणार आहे तर किराणा, भाजीपाला,फळे, बेकरी, पशुखाद्य विक्रेत्यांना घरपोच सेवा देतात येणार आहे. सकाळी ७ ते रात्री आठपर्यंत ही सेवा देता येणार आहे. इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर फिरू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी केले आहे.
चौकट
कृषी सेवा केंद्रांना अकरापर्यंत वेळ
लॉकडाऊनची मुदतवाढ देण्यात आल्यानंतर पूर्वीचीच नियमावली कायम राहणार आहे. त्यानुसार सध्या सुरू असलेल्या खरीप हंगामाची लगबग लक्षात घेता, कृषी सेवा केंद्रांना सकाळी ११ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.