कुलूप लागलेले कोविड सेंटर पुन्हा उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:29 AM2021-02-24T04:29:01+5:302021-02-24T04:29:01+5:30
सांगली : रुग्णसंख्या घटल्याने सांगली, मिरज व कुपवाड महापालिका क्षेत्रातील बंद केलेली कोविड सेंटर्स पुन्हा सुरू करण्याची तयारी जिल्हा ...
सांगली : रुग्णसंख्या घटल्याने सांगली, मिरज व कुपवाड महापालिका क्षेत्रातील बंद केलेली कोविड सेंटर्स पुन्हा सुरू करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्यासाठी बुधवारी बैठक होणार आहे. सध्या कोरोना साथ नियंत्रणात असली तरी सतर्कता म्हणून वैद्यकीय यंत्रणा पुन्हा सज्ज ठेवण्यात येणार आहे.
महापालिका क्षेत्रात शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटर सध्या सुरू आहे. पोस्ट कोविड सेंटर, क्रीडा संकुल, भारती हाॅस्पिटल, वानलेस हॉस्पिटल येथे कोविड सेंटर होते. यातील बहुतांश सेंटर आता बंद केली असून केवळ मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील केंद्र सुरू आहे. महापालिकेनेही आदिसागर मंगल कार्यालयात मोठे कोविड सेंटर उभारले होते. त्यामुळे महापालिका क्षेत्रात सात शासकीय व अन्य खासगी अशी १९ कोविड सेंटर उभारली होती. यातील काही महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत तर काही योजनेत समाविष्ट नसलेली होती. आता सुरुवातीला योजनेतील कोविड सेंटर्स सुरू केली जाणार आहेत.
कोट
कोविड सेंटर्स सुरू करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक झाल्यानंतर प्रत्यक्ष बंद सेंटर्सची पाहणी केली जाईल. वैद्यकीय उपकरणांची तपासणी करून पुढील आदेश देण्यात येतील. यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.
- डाॅ. संजय साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक
सध्याची रुग्ण स्थिती
रुग्णालय रुग्ण
मिरज कोविड सेंटर ३६
भारती हॉस्पिटल १५
मिरज चेस्ट सेंटर ५
सिनर्जी ४
होम आयसोल्युशनमधील ६७
एकूण उपचाराखालील १२७
चौकट
आजवरचे रुग्ण ४८,४००
बरे झालेले रुग्ण ४६५१६
मृत्यू १७५७
चौकट
ग्रामीण रुग्णही सांगली, मिरजेत
ग्रामीण भागातील रुग्णही सध्या सांगली, मिरजेत दाखल होत आहेत. ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सज्जतेबद्दलही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. सद्य:स्थितीत कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे. सध्या ऑक्सिजनवर २१, इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ६, नेझल ऑक्सिजनवर ४ रुग्ण आहेत.