लोकसभा की विधानसभा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:23 AM2020-12-23T04:23:11+5:302020-12-23T04:23:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राजकीय साठमारीत अडकलेले वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा कॉंग्रेसचे नेते विशाल पाटील सध्या पुन्हा ...

Lok Sabha Assembly? | लोकसभा की विधानसभा?

लोकसभा की विधानसभा?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : राजकीय साठमारीत अडकलेले वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा कॉंग्रेसचे नेते विशाल पाटील सध्या पुन्हा द्विधावस्थेत दिसत आहेत. गेल्यावेळेप्रमाणे यावेळीही ‘लोकसभा लढवायची की विधानसभा’, या प्रश्नाचे उत्तर त्यांना सापडलेले नाही. परिणामी ‘गहू तेव्हा पोळ्या’ या उक्तीप्रमाणे वाटचाल करत त्यांनी दादा गटाच्या मजबुतीसाठी कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवला आहे.

विशाल पाटील हे दादांचे धाकटे नातू. थोरले बंधू तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक यांच्या राजकीय संन्यासानंतर त्यांना राजकारणाची कवाडे खऱ्या अर्थाने उघडी झाली. वसंतदादा घराण्याचे वलय, राजकीय धडाडी, लखलखीत व्यावसायिक यश, उपजत मुरब्बीपणा, जिल्ह्यासह आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास या त्यांच्या जमेच्या बाजू. जिल्हा बॅंकेत थेट मदन पाटील यांना आस्मान दाखवून ते संचालक झाले. नंतर बाजार समितीतही स्वत:च्या गटाचे संचालक निवडून आणले. जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीवेळी मिरज तालुक्यात ताकद दाखवली. महापालिकेत चार-सहा नगरसेवकांना निवडून येण्यासाठी बळ दिले. पण जेव्हा स्वत: मैदानात उतरण्याची तयारी केली, तेव्हा लोकसभा लढवायची की विधानसभा, असा प्रश्न समोर आला. सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपकडून संजयकाका पाटील, तर सांगली विधानसभा मतदारसंघात सुधीर गाडगीळ या विद्यमान खासदार-आमदारांचे तगडे आव्हान होते. विशाल यांचा कल खासदारकीपेक्षा आमदारकीकडे अधिक होता, पण विधानसभेला सांगलीतून मातब्बर इच्छुकांची दावेदारी होती. लोकसभेची निवडणूक आधी होती. विशाल यांनी सुरुवातीला उमेदवारी मागितली नाही, पण नंतर तयारी सुरू करताच सांगली लोकसभेची जागा कॉंग्रेसने आघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली. तो सगळा ‘गेम प्लॅन’ होता. लढायचे की नाही, अशा संभ्रमात असताना राजू शेट्टी आणि कॉंग्रेसमधील काहींनी विशाल यांना ‘स्वाभिमानी’ची उमेदवारी घ्यायला लावली. सगळे जमवून आणले जात असताना वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकरही रिंगणात उतरले. तेथेच डाव फसला. विशाल यांनी साडेतील लाखावर मते घेतली, पण पडळकरांनी घेतलेल्या तीन लाख मतांमुळे संजयकाका पाटील यांनी बाजी मारली. कारण पडळकरांनी संजयकाकांपेक्षा विशाल यांचीच जादा मते खाल्ली. लोकसभेच्या पराभवानंतर लगेच आलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारीवर दावा करताच आला नाही...

सध्या लक्ष्य

जिल्हा बॅंक, बाजार समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती

मिरज पूर्व-पश्चिम

प्रत्येक तालुक्यात गट

पिकेल तेव्हा गहू आणि नंतर पोळ्या

जयंत-विश्वजित

जयंत कोपरखळी

पक्ष निश्चिती, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट

तरुण रक्त

Web Title: Lok Sabha Assembly?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.