Lok Sabha Election 2019 विशाल यांचा ३५ लाख खर्च, तर संजयकाकांचा ५९ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:25 PM2019-04-16T23:25:10+5:302019-04-16T23:25:53+5:30

शरद जाधव। लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या सूक्ष्म खर्चावरही निवडणूक विभागाची करडी नजर असून, प्रत्येक उमेदवाराला ...

Lok Sabha Election 2019 expenditure of 35 lakh, while Sanjayankar's 59 million | Lok Sabha Election 2019 विशाल यांचा ३५ लाख खर्च, तर संजयकाकांचा ५९ लाख

Lok Sabha Election 2019 विशाल यांचा ३५ लाख खर्च, तर संजयकाकांचा ५९ लाख

Next

शरद जाधव।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या सूक्ष्म खर्चावरही निवडणूक विभागाची करडी नजर असून, प्रत्येक उमेदवाराला आपला खर्च देताना दमछाक होत आहे. अभिरूप निरीक्षण नोंदवहीनुसार भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांचा सर्वाधिक खर्च ५९ लाख ५८ हजार ७६३ रुपये झाला आहे, तर आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांचा खर्च ३५ लाख ७० हजार ४११ रूपये झाला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकरही मागे नसून, त्यांनी आतापर्यंत २८ लाख २३ हजार ७७३ रूपये खर्च केला आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रचारादरम्यान तीनवेळा उमेदवारांना आपला खर्च सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात उमेदवाराने सादर केलेला खर्च व अभिरूप निरीक्षण नोंदवहीतील तपशिलाचा ताळेबंद करून त्यातील तफावत व इतर अहवाल तात्काळ आयोगास सादर करण्यात येत आहे.
उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी सोमवारी पूर्ण झाली असून त्यानंतर भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील व आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या खर्चातील तफावतीमुळे त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे.
उमेदवारांनी सादर केलेला खर्च हा नोंदवहीतील नोंदींच्या तुलनेत कमी आहे. उमेदवारांचा वाहनांवरील खर्च व इतर खर्च निवडणूक विभागाने नोंदविल्यामुळे नोंदवही आणि प्रत्यक्ष उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाच्या नोंदीत तफावत आढळून येत आहे. मात्र अंतिम खर्च सादर करताना छोट्या-मोठ्या खर्चासोबतच सूक्ष्म खर्चाचा विचार करून त्यांचा मेळ घालण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी ७० लाखांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवारांना १० हजार रुपयांपर्यंतचा खर्च रोखीने करण्यास संमती देण्यात आली आहे. यापेक्षा अधिकचा होणारा आर्थिक व्यवहार हा उमेदवारांना रोखीने करता येणार नाही. आता गुरूवारी उर्वरित खर्च उमेदवारांना सादर करण्याबाबत सांगण्यात आले आहे. २३ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर उमेदवारांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खर्चाचे प्रतिज्ञापत्रही खर्च निरीक्षकांना सादर करावे लागणार आहे. त्यानंतर निवडणूक खर्च निरीक्षक त्यांच्या खर्चाची तपासणी करणार आहेत.
तीनवेळा खर्च द्यावा लागणार
निवडणूक कालावधित उमेदवारांना तीनवेळा आपल्या खर्चाचा तपशील सादर करावा लागणार आहे. यामुळे आता गुरूवारी व त्यानंतर २१ एप्रिललाही सर्व उमेदवारांना आपला खर्च प्रशासनासमोर द्यावा लागणार आहे. यात तफावत आढळल्यास उमेदवारांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात येतील.
वाहनांवरील खर्च जादा
उमेदवारांचा प्रामुख्याने वाहनांवरील खर्च तूर्तास जादा असल्याचे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाचा भौगोलिक आवाका मोठा आहे. यासाठी त्या-त्या भागात प्रचार यंत्रणा राबविताना उमेदवारांना वाहनांची सोय करावी लागत आहे. उमेदवारांकडून सर्वप्रथम वाहनांची परवानगी घेण्यात येते. त्याचाही तपशील एकत्रित करण्याचे काम प्रशासनातर्फे सुरू होते. यात प्रमुख पक्षांसह अपक्षांनीही प्रचारासाठी वापरलेल्या साधनांची मोजदाद होऊन त्याची नोंद केली जात आहे.
निवडणुकीसाठी खर्च मर्यादा ७० लाखांची असणार
उमेदवारांना निवडणूक कालावधित ७० लाखांपर्यंतच्या खर्चाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मतदारसंघाचे मोठे क्षेत्र, वाहनांची सोय, कार्यकर्त्यांचा लवाजमा लक्षात घेता, ठरवून दिलेल्या मर्यादेत निवडणुकीचा खर्च करताना उमेदवारांची दमछाक होत आहे. नियमानुसार खर्चालाच प्राधान्य दिले जात आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019 expenditure of 35 lakh, while Sanjayankar's 59 million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.