Lok Sabha Election 2019 सरकारला सत्तेची मस्ती; पायउतार करा : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:56 PM2019-04-12T23:56:21+5:302019-04-12T23:56:43+5:30

तासगाव : भाजपचे प्रदेशाध्यक्ष शेतकऱ्यांना ‘साले’ म्हणतात. प्रवक्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ‘लावारिस’ म्हणतात. भाजप सरकारला सत्तेची मस्ती आली आहे. ...

Lok Sabha Election 2019 Government has power; Step down: Sharad Pawar | Lok Sabha Election 2019 सरकारला सत्तेची मस्ती; पायउतार करा : शरद पवार

Lok Sabha Election 2019 सरकारला सत्तेची मस्ती; पायउतार करा : शरद पवार

Next

तासगाव : भाजपचे प्रदेशाध्यक्ष शेतकऱ्यांना ‘साले’ म्हणतात. प्रवक्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ‘लावारिस’ म्हणतात. भाजप सरकारला सत्तेची मस्ती आली आहे. हे सरकार पायउतार करायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तर महाराष्टÑातील सभांमध्ये माझ्यावर टीका करतात. त्यामुळे माझी बिनपैशाची जाहिरात होत आहे, अशी टीका राष्टÑवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी येथे केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची बाजार समितीच्या बेदाणा सभागृहामध्ये सभा झाली, यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी महाराष्टÑात सहा सभा घेतल्या. प्रत्येक सभेत त्यांनी माझ्यावर टीका केली. आमचा पक्ष सत्तेत नाही. त्यामुळे जाहिरातींवर खर्च करणे परवडणारे नाही. त्यामुळे मोदींकडून माझी फुकटची प्रसिद्धी केली जात आहे. आमच्या कुटुंबावर आईचे संस्कार आहेत. घर मोठे आहे. वेगळे राहत असलो तरी, कुटुंबात एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो. तुम्हाला घरच नाही. ज्याला घर सांभाळायचे माहीत नाही, त्याने कशाला आमच्या घरात डोकावायचे?
ते म्हणाले की, विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका जिनिव्हा करारानुसार झाली. त्यावेळी ५६ इंच छातीमुळे सुटका झाल्याचे सांगितले. मात्र, महाराष्टÑातील कुलभूषण जाधव यांची पाकिस्तानातून सुटका करताना, हीच छाती १५ इंचांची झाली. मोदींकडून देशाचे रक्षण होईल यावर विश्वास नाही. प्रधानमंत्री गमतीची भाषणे करतात. पाच वर्षांत भरमसाट शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, याचे उत्तर शरद पवारांना विचारा, असे वक्तव्य प्रधानमंत्री करतात. आम्ही ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. मोदी सरकारच्या काळापेक्षा आमच्या काळात शेतीमालाला चांगला हमीभाव मिळत होता. शेतकºयांनी देशाचे उत्पन्न व उत्पादन वाढविले. खासदार राजू शेट्टी म्हणाले की, शिवसेना-भाजप सरकारने शेतकºयांचा विश्वासघात केला आहे. मी त्यांना सोडणार नाही. आम्ही कालही शेतकºयांसोबत होतो, आजही आहे, उद्याही राहणार. गेल्या पाच वर्षात भाजप नेत्यांना अफझलखानाची फौज म्हणणारे आणि ‘चौकीदार चोर है’ म्हणणारे उध्दव ठाकरे भाजपच्या वळचणीला का गेले? चार वर्षातील उध्दव ठाकरेंची भाषणे आणि सामनातील अग्रलेख यांचा विचार केला, तर खरे काय आणि खोटे काय, हा प्रश्न पडतो.
ते म्हणाले की, निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विद्यमान खासदारांना ही लढत एकतर्फी वाटत होती. आमच्या उमेदवाराचे नाव जाहीर केल्यानंतर मात्र त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे.
राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील म्हणाले की, विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पातळी सोडून बोलणारे, देशाच्या इतिहासातील मोदी पहिले पंतप्रधान आहेत. आघाडी सरकारच्या काळात आम्ही पाणीपट्टी न घेता सिंचन योजनांचे पाणी दिले. युती सरकारने मात्र शेतकºयांच्या माथी पाणीपट्टीचा बोजा मारला आहे. आमचे सरकार आल्यानंतर पाणीपट्टी माफ करू.
आमदार विश्वजित कदम म्हणाले की, भाजपचे उमेदवार मतदारसंघात दहशतीचे वातावरण निर्माण करतात. त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांच्या गुंडगिरीमुळे त्यांना जिल्'ातून बाहेर काढायची वेळ आली आहे. विशाल पाटील यांच्यासाठी आम्ही प्रचाराची बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. मॅच जिंकूनच थांबणार आहोत.
विशाल पाटील म्हणाले की, शरद पवार यांनीच मला राजकारणात पुढे आणले आहे. तासगाव-कवठेमहांकाळमधील गुंडगिरी तेच मोडून काढतील यात शंका नाही.
आमदार सुमनताई पाटील म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षात जिल्'ात कोणताही विकास झाला नाही. उलट जिल्हा भकास झाला. तासगाव-कवठेमहांकाळमधील जनता दबावाचे राजकारण झुगारून देऊन विशाल पाटील यांना मोठे मताधिक्य देईल.
यावेळी इलियास नायकवडी, सुरेश पाटील, अविनाश पाटील आनंदराव मोहिते, अरुण लाड, शरद लाड, ताजुद्दीन तांबोळी, महेश खराडे, पृथ्वीराज पाटील, अमित शिंदे, अनिता सगरे, प्रमोद पाटील, बाबासाहेब मुळीक उपस्थित होते.

आमच्या घरात भांडण : विशाल पाटील
आज सकाळी घरात भांडण झाले. प्रतीक पाटील मला म्हणाले की, मी तीनदा उभा राहिलो, पण शरद पवार प्रचाराला आले नाहीत. काँग्रेसचे चिन्ह नसताना तू पहिल्यांदाच उभा राहिलास, मात्र शरद पवार प्रचाराला आले. यामागचे नेमके कारण काय? अशी चर्चा झाल्याचे सांगत विशाल पाटील यांनी शरद पवारांचे आभार मानले.
विशाल पाटील सिक्सर मारतील
शरद पवार म्हणाले की, क्रिकेटचा आणि माझा खूप जुना आणि जवळचा संबंध आहे. त्यामुळे बॅट आणि बॅटिंग माझ्यासाठी नवीन नाही. या निवडणुकीत विशाल पाटील जोरदार बॅटिंग करतील आणि विजयाचा सिक्सर मारतील.

Web Title: Lok Sabha Election 2019 Government has power; Step down: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.