‘लोकमत’ शॉपिंग कार्निव्हलची दिवाळी सोडत जाहीर

By admin | Published: November 7, 2014 10:43 PM2014-11-07T22:43:30+5:302014-11-07T23:31:48+5:30

भरघोस प्रतिसाद : सन्मती डिस्ट्रिब्युटर्सचे अशोक पाटील बंपर बक्षीस विजेते

'Lokmat' announced the shopping carnival of Diwali | ‘लोकमत’ शॉपिंग कार्निव्हलची दिवाळी सोडत जाहीर

‘लोकमत’ शॉपिंग कार्निव्हलची दिवाळी सोडत जाहीर

Next

सांगली : ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या दिवाळी शॉपिंग कार्निव्हलला जिल्ह्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला. सांगलीच्या एसएफसी मेगा मॉलच्या सभागृहात गुरुवार दि. ६ नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत लकी कूपन्सची सोडत काढण्यात आली. यामध्ये सन्मती डिस्ट्रिब्युटर्सचे ग्राहक अशोक पाटील हे योजनेतील बंपर बक्षिसाचे (३२ इंची एल ई डी टीव्ही) मानकरी ठरले. खानापूर येथील अनिता सुपर शॉपीतर्फे योजनेतील सर्व बक्षिसे प्रायोजित करण्यात आली होती.
शॉपिंग कार्निव्हल स्पर्धा आॅक्टोबर महिन्यात घेण्यात आली होती. सोडतीमध्ये सांगलीतील बजाज अ‍ॅग्रो अ‍ॅण्ड आॅटोचे ग्राहक हरिदास निवृत्ती यादव (रा. येळावी) हे प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाचे (२४ इंची एल ई डी टीव्ही) मानकरी ठरले. सांगली येथील गणेश ट्रेडर्सचे ग्राहक विकास जाधव (सांगली) आणि सिध्दिविनायक हिरो मिरजचे ग्राहक संजय अष्टेकर (सांगली) हे द्वितीय क्रमांकाच्या बक्षिसाचे (वॉशिंग मशीन) विजेते ठरले. सांगलीतील पेंडूरकर ज्वेलर्सचे ग्राहक सविता जप्तीवाले (सांगली), लक्ष्मी एंटरप्राईझेस सांगलीचे ग्राहक अमोल पाटील (सांगली) आणि खेराडकर सराफ सांगलीचे ग्राहक अंकिता ठाकूर (सांगली) हे तृतीय क्रमांकाच्या (स्टिल डिनर सेट) बक्षिसाचे विजेते ठरले. शॉपिंग कार्निव्हल योजनेत तीसहून अधिक दुकानदारांचा सहभाग होता. या स्पर्धेला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)

विजेत्यांची नावे रविवारी जाहीर होणार
उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेल्या १५० विजेत्यांची नावे रविवार दि. ९ रोजीच्या अंकात जाहीर करण्यात येणार आहेत. विजेत्यांनी त्यांची बक्षिसे सांगलीतील ‘लोकमत’ कार्यालय, कलाश्री आर्केड, राममंदिर कॉर्नर येथून सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० या कालावधित वीस दिवसांच्या आत घेऊन जावीत. सोबत कूपन आणि आपल्या ओळखपत्राची प्रत घेऊन येणे आवश्यक आहे.

Web Title: 'Lokmat' announced the shopping carnival of Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.